‘बिग बॉस १६’ शोचे स्पर्धक पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. या पर्वातील सर्वाधिक चर्चेत ठरलेला स्पर्धक म्हणजे अब्दू रोजिक. अब्दूचे आता लाखो चाहते आहेत. पण अब्दूला आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जावं लागणार आहे. अचानक या शोमधून त्याची एक्झिट होणं सध्या प्रेक्षकांनाही पटत नसल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर शाहरुख खानचा लूक भारी, लाखो रुपयांचा खर्च, शूजची किंमत आहे…

हिंदी कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू रडताना दिसत आहे. तसेच ‘बिग बॉस’ ही अब्दूला घराबाहेर येण्यास सांगत आहेत. ‘बिग बॉस’ने अब्दूला घराबाहेर येण्यास सांगितल्यावर घरातील सदस्यही हैराण होतात.

पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस १६’चा नवा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकही हैराण झाले आहेत. या प्रोमोमध्ये घरातील सदस्यही रडताना दिसत आहेत. तर अब्दूही इतर सदस्यांना मिठी मारुन ढसाढसा रडत आहे. पण अब्दूला घराबाहेर का जावं लागलं? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे, समुद्रकिनारी वाळूत लोळली अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सोशल मीडियावर अब्दू ट्रेंड होत आहे. आम्ही अब्दूसाठी शो पाहतो, शोमध्ये अब्दूला पुन्हा आणा, अब्दू रोजिक ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाऊच शकत नाही असे त्याचे चाहते हा व्हिडीओ पाहून बोलत आहेत. आता खरंच या प्रोमोनुसार अब्दूला हा खेळ अर्धवट सोडावा लागणार का? हे पाहावं लागेल.