छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचं ‘बिग बॉस हिंदी’चं पर्व काही विशेष कारणांमुळे चर्चेत राहिलं. ताजिकिस्तानचा अब्दू रोजिक ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. त्यामुळेच त्याने शोमधून एक्झिट घेतल्यानंतर चाहते नाराज झाले होते.

‘बिग बॉस’च्या घरात अब्दूला परत आणण्याची मागणी होत होती. आता अब्दूने घरात पुन्हा प्रवेश केल्याने चाहते सुखावले आहेत. अब्दू त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज घेऊन आला आहे. लवकरच तो मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या चित्रपटातूनच अब्दू बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा>> “तुनिषाने याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यावेळी मी…”; अटकेत असलेल्या शीझान खानचा धक्कादायक खुलासा

हेही वाचा>> “मी तुझ्यावर प्रेम करतो”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकच्या नवऱ्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात अब्दू झळकणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेतबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. सलमान खानबरोबर अब्दूला स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा>> लग्नानंतर कुंकू न लावल्यामुळे देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणतात “तू पुढची तुनिषा शर्मा…”

ताजिकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवलेला अब्दू हा गायक आहे. १८ वर्षीय अब्दूच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या गाण्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्याने गायलेल्या हिंदी गाण्यांनाही नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.