‘बिग बॉस १६’मध्ये पहिल्या दिवसापासूनच प्रियांक चहर चौधरीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं होतं. त्यामुळे ती विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. अगदी बिग बॉस १६ च्या फिनाले दिवशीही प्रियांकाच ट्रॉफी जिंकणार असं चित्र सोशल मीडिया ट्रेंडमधून दिसत होतं. मात्र एनवेळी प्रियांका या शोमधून बाहेर पडली आणि एमसी स्टॅन शोचा विजेता झाला तर शिव ठाकरे पहिला रनरअप ठरला. प्रियांका टॉप २ मध्ये जागा बनवण्यास अपयशी ठरली. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विजेतेपद आणि शिव ठाकरेबद्दल तिने मोठं विधान केलं आहे.

बिग बॉस १६च्या महाअंतिम सोहळ्यानंतर प्रियांका चहर चौधरीने स्वतःची हार आणि एमसी स्टॅनच्या विजेतेपदावर प्रतिक्रिया दिली. एमसी स्टॅन एका खऱ्या व्यक्तीप्रमाणे होता म्हणून तो जिंकला असं मत प्रियांकाने व्यक्त केलं. तर स्वतःबद्दल बोलताना तिने, “मी जिंकले नसले तरी लोकांची मनं जिंकू शकले त्यासाठी मी आनंदी आहे.” असं तिने म्हटलं. पण याचबरोबर विजेतेपदाबद्दल तिने महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

आणखी वाचा-“मी बाथरुममध्ये जाऊन…”, बिग बॉस १६ जिंकल्यानंतर एमसी स्टॅनचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

‘ई-टाइम्स’शी बोलताना प्रियांका म्हणाली, “मी स्टॅनसाठी खूप खुश आहे. तो शोबद्दल कधीच गंभीर नव्हता. पण तरीही तो जिंकला कारण तो जसा आहे तसाच नेहमी वावरत राहिला. तो एक चांगला व्यक्ती आहे आणि मी त्याच्यासाठी आनंदी आहे. जे काहीही घडतं त्यामागे काहीतरी कारण असतं. मी शो जिंकू शकले नाही पण लोकांची मनं जिंकली आहेत. लोकांचं एवढं प्रेम मिळत आहे ते पाहिल्यानंतर खूप छान वाटतं.”

बिग बॉसचं विजेतेपद आणि शिव ठाकरेबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “माझ्या मते बिग बॉसच्या ट्रॉफीवर सर्वात जास्त हक्क हा शिव ठाकरेचा होता. अर्थात मला शिवपेक्षा स्टॅन जास्त आवडतो. पण शिव माझ्यासाठी खरा विजेता आहे. तो पहिल्या दिवसापासून या ट्रॉफीसाठी खेळत होता आणि प्रत्येक खेळात त्याने स्वतःचे १०२ टक्के दिले आहेत. त्याने खूपच प्रामाणिकपणे प्रत्येक टास्क पूर्ण केला होता.”

आणखी वाचा- “जे व्हायचे ते झालं आणि ट्रॉफी…”, बिग बॉस १६ मधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिव ठाकरेने एमसी स्टॅनचं विजेतेपद आणि स्वतःची हार यावर भाष्य केलं होतं. तो म्हणाला, “जे व्हायचं होतं ते झालं आणि ट्रॉफी माझ्या मंडलीमध्ये गेली आहे. माझा मित्र एमसी स्टॅनच्या हातात आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. मी अखेरच्या दिवसापर्यंत विजेतेपदाच्या शर्यतीत होतो. जे मी मनापासून केलं त्याचं फळ मला मिळालं आहे. लोकांनी माझं कौतुक केलं. आज अनेक लोक मला ओळखतात. ज्यासाठी मी बिग बॉसच्या घरात गेलो होतो ती गोष्ट मला मिळाली आहे.”