‘बिग बॉस हिंदी १६’चा अंतिम सोहळ्यात एमसी स्टॅनने बाजी मारली. रॅपर एमसी स्टॅनने सर्वाधकि मतं मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. एमसी स्टॅन विजेता ठरल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदनेही एमसी स्टॅनसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एमसी स्टॅनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हातात घेऊन एमसी स्टॅनने सलमान खानबरोबर पोझ दिली आहे. हा फोटो शेअर करत उर्फीने एमसी स्टॅनचं अभिनंदन केलं आहे. उर्फीने एमसी स्टॅनसाठी ट्वीटही केलं आहे.

हेही वाचा>> “बिग बॉस पुन्हा बघणार नाही”, एमसी स्टॅन विजेता ठरल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी, म्हणाले “शिव ठाकरे व प्रियांकाने मेहनत…”

urfi javed mc stan

“अभिनंदन एमसी स्टॅन” असं ट्वीटमध्ये म्हणत उर्फीने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.याआधी उर्फीने तिच्या ट्वीटरवरुन एमसी स्टॅनला वोट करण्यासाठी आवाहनही केलं होतं. उर्फीने एमसी स्टॅनच्या स्टाइलमध्ये ट्वीट करत “ए शेंबडी, एमसी स्टॅनला वोट केलं का?” असं म्हटलं होतं.

हेही वाचा>> Bigg Boss 16: दीड कोटींची चेन, ८० हजारांचे बूट अन्…; ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनची एकूण संपत्ती माहीत आहे का?

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकली पण शिव ठाकरेची ‘ती’ इच्छा पूर्ण, म्हणालेला “सलमान सरांच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीसाठी एमसी स्टॅन, शिव ठाकरे व प्रियांका चौधरी यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण अखेर एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’चा विजेता ठरला. तर शिव ठाकरेला दुसऱ्या व प्रियंका चौधरीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. एमसी स्टॅन ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याबरोबरच त्याला ३१ लाख ८० हजार रुपये रक्कम देण्यात आली. एमसी स्टॅनला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली.