‘बिग बॉस’ हिंदीचं १६ वं पर्व यंदा विशेष गाजलं. प्रेक्षकांनी पसंती दिल्यामुळे निर्मात्यांनी हा शो एक महिन्यासाठी एक्स्टेंड केला होता. या शोचा ग्रँड फिनाले होऊन १० दिवस झाले आहेत, पण अजूनही यातील स्पर्धकांची चांगलीच चर्चा आहे. दरम्यान, आता या शोमधील दोन सदस्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

“संघी लोकांनी किमान…” स्वरा भास्करने ट्वीटमध्ये भाऊ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहाद अहमदचं उत्तर

‘बिग बॉस १६’ मध्ये दिग्दर्शक साजिद खान सहभागी झाला होता. पण फिनालेपूर्वीच तो घरातून बाहेर पडला होता. तर, आताची चर्चा ही साजिद खान आणि सौंदर्या शर्माबद्दल होत आहे. साजिद व सौंदर्या एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. साजिद खानने शहनाज गिलला मुख्य भूमिकेत घेऊन एक चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. त्या चित्रपटातील एका गाण्यावर सौंदर्या शर्मा डान्स करणार असल्याचं वृत्त अमर उजालाने दिलं आहे.

दुसऱ्या पत्नीशी पहिलीसाठी विश्वासघात, ६५व्या वर्षी बोल्ड सीन अन् प्रियांका चोप्राबरोबर…; अभिनेते अन्नू कपूर यांचे वादग्रस्त किस्से

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साजिद व सौंदर्या एकमेकांना डेट करत आहेत, त्यामुळे साजिदने तिला गाण्यासाठी ऑफर दिली आहे. या दोघांची बिग बॉसच्या घरात चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता शो संपल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दोघांनीही याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या चर्चा कदाचित अफवादेखील असू शकतात.