‘बिग बॉस १६’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काही सदस्यांमध्ये भांडणं तर काहींमध्ये सध्या लव्ह अँगल पाहायला मिळत आहे. ज्याची जोरदार चर्चा होत आहे. विशेषता घरातील सदस्य शालीन भानोत सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. बिग बॉस १६ चा नुकताच प्रसारित झाला. ज्यात अभिनेता शालीन भानोत सौंदर्या शर्माला किस करताना दिसत आहे. ज्यावर घरात नवा वाद सुरू झाला आहे. शालीन आणि गौतम यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

‘बिग बॉस १६’ सुरू झाल्यापासूनच सौंदर्या शर्मा आणि गौतम विग तसेच शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात लव्ह अँगल पाहायला मिळत आहे. अर्थात याबाबत कोणीही स्पष्टपणे बोललेलं नाही मात्र गौतमला सौंदर्या आवडते हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण शालीनला चिडवण्यासाठी गौतम विग मागच्या एपिसोडमध्ये टीना दत्ताशी फ्लर्ट करताना दिसला होता. त्यामुळे शालीननेही गौतमला चिडवण्यासाठी सौंदर्याशी फ्लर्ट करायला सुरुवात केली होती.

आणखी वाचा- पूर्वाश्रमीच्या पत्नीने केली शालीन भानोतची पोलखोल, म्हणाली “तुझ्या लव्ह लाइफसाठी…”

शालीन आणि सौंदर्यामध्ये सुरू असलेलं फ्लर्ट गौतम शांतपणे सहन करत होता. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये शालीनने सर्व मर्यादा पार केलेल्या दिसून आल्या. शालीनने सर्वांसमोर सौंदर्याला किस केलं आणि हे पाहिल्यानंतर गौतम भडकला. त्याने शालीनला त्यानंतर बरंच सुनावलं. हे सर्व अती होत असल्याचं त्याने शालीनला सांगितलं. दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि गौतमने सगळा राग शालीनवर काढला. गौतम अशाप्रकारे चिडलेला पाहून सुरुवातीला हसत हसत सर्व एन्जॉय करत असलेली सौंदर्या गप्प झाली.

आणखी वाचा-“माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच्याच एका एपिसोडमध्ये शालीन भानोतने सौंदर्याच्या अंतर्वस्त्रांवर कमेंट केली होती. ज्यामुळे सौंदर्या नाराज झाली होती आणि तिने ही नाराजी गौतमकडे बोलून दाखवली होती. त्यानंतर बिग बॉसने गौतमला बोलावून टीना आणि शालीन यांच्याबाबत त्याचं मत विचारलं होतं. ज्यावर गौतमने ते दोघं खोटं खोटं वागत असल्यासारखं दिसत आहे असं मत मांडलं होतं.