‘बिग बॉस १६’मधील सध्या चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे सुंबूल तौकीर खान. सुंबूल, शालीन भानोत व टीना दत्ताबरोबर तिचं असणारं नातं तर अधिकच चर्चेत आहे. आता या शोमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे. सुंबूलच्या सगळ्यात जवळच्या मित्राची ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एन्ट्री होणार आहे. पण त्याआधीच शालीनच्या रागाचा सुंबूलला सामना करावा लागत आहे. घरामध्ये सुंबूलच्या आरोग्यावर परिणाम झाला असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 16 : घट्ट मिठी मारली, रडू लागली अन्…; सुंबूल तौकीरच्या जवळच्या मित्राची ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री

कलर्स टीव्ही वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शालीनचा राग अनावर झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच शालीन लिव्हिंग रूममधील टेबलला जोरात लाथ मारताना दिसत आहे.

सुंबूलला शालीन त्याच्यापासून दूर राहायला सांगतो. दरम्यान शालीन-सुंबूलमध्ये वाद सुरू असताना टीनाही या वादामध्ये सहभाग घेते. “लोक तेच बोलत आहेत जे बाहेर दाखवलं जात आहे. माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले जात आहेत.” असं टीना म्हणते.

आणखी वाचा – Video : “हिडीस बाई, मी नाही त्यातली अन् कडी लाव…” टास्कदरम्यान अपूर्वा नेमळेकर व तेजस्विनी लोणारीत जुंपली, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान शालीन म्हणतो, “आमची काय चुकी आहे? ती स्वतःच आमच्या जवळ येते.” शालीन व टीनाचं वागणं पाहून सुंबूल रडू लागते. या दोघांचं वागणं तिला सहन होत नाही. सुंबूलला भांडणामध्येच पॅनिक अ‍टॅकचा त्रास सुरु होतो. घरातील इतर सदस्य तिच्या पाठिशी उभे राहतात. हा व्हिडीओ पाहून टीना व शालीनबाबत कमेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे. आता आजच्या भागामध्ये आणखी काय घडणार हे पाहावं लागेल.