टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात नुकतीच बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरहान अवतारमणी उर्फ ओरीची वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली होती. त्यामुळे ओरीच्या एन्ट्रीमुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलणार का? सध्या घरात असलेल्या तगड्या स्पर्धकांना तो पुरून उरणार का? हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. पण ओरी एका दिवसातच बिग बॉसमधून बेघर झाला. हे पाहून घरातील स्पर्धकांसह प्रेक्षकांना देखील धक्का बसला आहे. ओरी हा एका दिवसात बिग बॉसमधून का बाहेर झाला? जाणून घ्या…

शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) झालेल्या ‘वीकेंड का वार’ला ओरीची बिग बॉसमध्ये एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. सलमान खानने ओरी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार असल्याचं जाहीर केलं. त्याप्रमाणे बिग बॉसच्या घरात ओरीची दमदार एन्ट्री झाली. मग दर रविवार प्रमाणे काल, जस्ट चिल विथ सोहेल अँड अरबाज सेशन झालं. ज्यामध्ये अरबाज खान आणि सोहेल खानने स्पर्धकांबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यावेळी ओरीची खिल्ली उडवली गेली. पण जाता-जाता अरबाज आणि सोहेल ओरीला घराबाहेर घेऊन गेले. ओरी हा फक्त एक दिवसासाठी शोमध्ये आला होता, असं अरबाज-सोहेलने सर्वांना सांगितलं. अशाप्रकारे ओरी एका दिवसातच बेघर झाला.

हेही वाचा – रिंकू राजगुरुला आई-बाबांनी दिलं खास सरप्राइज; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

खरंतर ओरी हा वाइल्ड कार्ड स्पर्धक नव्हता तर तो फक्त वीकेंडला स्पर्धकांचं मनोरंजन करण्यासाठी शोमध्ये आला होता. हे ऐकून सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर ओरी सर्वांचा निरोप घेऊन बिग बॉसमधून बाहेर पडला.

हेही वाचा – अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रुल’साठी घेणार नाही मानधन, पण तरीही कमवणार कोट्यावधी रुपये; कसे काय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, येत्या काळात ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अनेक वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच अब्दू रोजिकची बिग बॉसमध्ये पुन्हा एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.