छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखला जाणारा ‘बिग बॉस’ सध्या जोरदार सुरू आहे. ‘बिग बॉस’चं १७वं पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. दिवसेंदिवस या शोच्या लोकप्रियतेत अधिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर येण्यासाठी निर्माते येत्या काही दिवसात आणखी वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री करणार आहेत. अशातच शोमध्ये अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. शोचा सूत्रसंचालक सलमान खानने हा बदल जाहीर केला आहे.

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची नवीन अपडेट समोर आली आहे. याचा प्रोमो ‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सलमान खान शोची वेळ बदलल्याचं जाहीर करताना दिसत आहे. सलमान म्हणतो की, “आपल्या वीकेंडच्या कार्यक्रमात एक बदल झाला आहे. २ डिसेंबरपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता नाही तर ९.३० वाजता ‘बिग बॉस’ प्रसारित होणार आहे. नवी वेळ ९.३०.”

हेही वाचा – “भारावून टाकणारा भारदस्त अनुभव…” लोकप्रिय दिग्दर्शकाने भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ नाटकाचं केलं कौतुक, म्हणाले…

हेही वाचा – Video: ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पडला पार; अभिनेता प्रसाद ओक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “साहेबांच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लवकरच ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अब्दु रोजिक झळकणार आहे. यासंदर्भात त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. तो बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये एन्ट्री करणार आहे.