मराठी, हिंदी बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेले अभिजीत बिचुकले नेहमी त्यांच्या अनोख्या शैलीमुळे चर्चेत असतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही ते उतरणार आहेत. लवकरच ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत? हे जाहीर करणार आहेत. अशातच त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. ही डॉक्टरेट पदवी कोणी दिली आणि कशासाठी दिली? याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे.

मॅजिक आणि आर्ट यूनिवर्सिटीकडून अभिजीत बिचुकले यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. कला व मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. याबाबत ‘साम टीव्ही’शी संवाद साधताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, “आनंदाचा क्षण आहे की, लोक, यूनिवर्सिटी, विद्यापीठ माझी दखल घ्यायला लागले आणि हे माझ्या कर्मामुळे होतं. कर्म माझं चांगलं आहे.”

हेही वाचा – अवघ्या आठ महिन्यांत ‘ही’ लोकप्रिय मालिका झाली ऑफ एअर, आज प्रसारित झाला शेवटचा भाग

“२३ मे १९९६ रोजी म्हणजे सरासरी २८ वर्षांपूर्वी क्षितिज नावाचा मी एक बालकविता संग्रह प्रकाशित केला. तेव्हा मी अवघ्या २० वर्षांचा होतो, तिथून माझा प्रवास सुरू झाला. तुमच्यासारख्या माध्यमांना माझा प्रवास माहितीच आहे. मराठी बिग बॉस असेल, हिंदी बिग बॉस असेल, मी तिथे जाऊ ठसा उमटवला. सातारा जिल्ह्याची म्हणा संपूर्ण मी आयडेंटीटी बनलो. सातारा जिल्हा, महाराष्ट्र हा जगाच्या नकाशावरती नेण्यामध्ये माझं योगदान आहे. त्यामुळे या यूनिवर्सिटीने माझ्याशी संपर्क साधला. ते विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते. त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ही डॉक्टरेट दिली आहे. आता इथूनपुढे आपण डॉक्टर अभिजीत वामनराव आव्हाडे-बिचुकले असं लावू शकतो. ही पदवी आपल्याला स्व-कष्टाने आणि स्व-कर्माने यूनिवर्सिटीने दखल घेऊन मिळाली आहे.”

हेही वाचा – पूजा सावंतनंतर ‘ही’ मराठी अभिनेत्री चढणार बोहल्यावर, देवक विधीचे फोटो आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बिचुकले म्हणाले, “या यूनिवर्सिटीचे फाऊंडर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये आले होते. ते जादूगार आहेत आणि ते विद्यापिठाचे प्रमुख आहेत. ते मला म्हणाले, बिग बॉस हिंदीमध्ये तुम्ही जी काही धमाल उडवून दिली. तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, महाराष्ट्रात राहता आणि मराठीत तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डॉक्टरेट देत आहोत. तुम्ही स्वीकार करालं? असं विचारलं. त्यामुळे मी डॉक्टरेट पदवी स्वीकारली.”