Bigg Boss Marathi 5 व्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांची विविध कारणांमुळे चर्चा होत असते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात पहिल्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री झाली आहे. संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. तो आल्याबरोबर त्याच्यामध्ये आणि निक्कीमध्ये मोठे भांडण झाल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

नेमकं घडलं काय?

कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, बिग बॉस घोषणा करतात, “या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील, जे अपात्र आहेत.” त्यानंतर संग्राम म्हणतो की मी निक्कीला सांगेन त्यांना पाण्यात जायचे आहे. त्यावर निक्की तांबोळी म्हणते, “मेडिकल कंडिशनमुळे मी पाण्यात उतरू शकत नाही.” त्यावर संग्राम म्हणतो, “बिग बॉस मी यांना ढकलणार आहे.” त्यावर निक्की म्हणते, “तुम्ही मला सांगूच शकत नाही.” विहिरीजवळच उभी असलेली निक्की जेव्हा धनंजय पोवारबरोबर बोलत असते, तितक्यात संग्राम तिला पाठीमागून ढकलतो. त्यानंतर निक्की जेव्हा पाण्यातून बाहेर येते, त्यावेळी ओरडून म्हणते, “हा माझ्याआधी बाहेर नाही निघाला ना, तर माझं नाव बदल.”

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने “स्वतःचं नाव नाही लावणार म्हणत निक्कीने संग्रामला दिलंय चॅलेंज जोरदार!”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता संग्रामचा घरातील हा पहिलाच दिवस असून बिग बॉसच्या घरात आल्याबरोबर त्याच्या आणि निक्कीमध्ये झालेल्या भांडणाची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या भागात बिग बॉसच्या घरात खेळ कसा रंगणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

हेही वाचा: “तुमची निष्ठा, तुमचा दृष्टिकोन…”, अंकिता लोखंडेने संजय लीला भन्साळींसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जेव्हा भाऊच्या धक्क्यावर संग्राम चौगुलेला रितेश देशमुखने टॉप ५ स्पर्धकांची नावे विचारली होती, त्यावेळी त्याने निक्कीला दुसऱ्या स्थानावर ठेवले होते. त्याचे कारण देताना म्हटले होते, “कोणी वंदा, कोणी निंदा, कॅमेरासमोर दिसणे हाच माझा धंदा”, असा निक्कीचा गेम आहे. याबरोबरच त्याने अभिजीतला पहिल्या स्थानावर, सूरजला तिसऱ्या स्थानावर, अरबाजला चौथ्या स्थानावर आणि जान्हवीला पाचव्या स्थानावर ठेवले होते. आता त्याच्या येण्याने घरातील कोणती समीकरणे बदलतील, कोणता नवीन कल्ला होणार, तसेच प्रेक्षकांना संग्रामचा खेळ आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.