Bigg Boss Marathi 5 Updates: ‘बिग बॉस मराठी ५’ चा दुसरा आठवडा सुरू आहे. दोन आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात अनेकांचे वाद, भांडणं पाहायला मिळाली. अनेकांनी काम न करण्यासाठी कारणंही सांगितली. पण या सगळ्यात सुरज चव्हाण (Suraj Chavan) मात्र कोणतीही तक्रार न करता घरात सातत्याने काम करताना दिसतोय. आता कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यात सुरज केर काढताना दिसतोय. या प्रोमोवर उत्कर्ष शिंदेने केलेली कमेंटही चर्चेत आहे.

प्रोमोत दिसतं की, सुरज कचरा काढतोय, त्याला पाहून अंकिता वालावलकर म्हणते, “त्याला असं पाहून मला कसंतरी वाटतंय.” यावर पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “तो बिचारा ऐरवीही तेच काम करत असेल बाहेर. तो काल मला म्हणाला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो, तुम्हाला खाली झोपावं लागतंय.” यावर अंकिता म्हणते, “म्हणजे त्याला गेम नाही कळला, पण माणसं कळाली.”

सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार ‘लापता लेडीज’, सरन्यायाधीशांनी सांगितलं स्क्रीनिंगचं कारण

Video:”तुझं प्रेम मिळालं तर पोट भरल्यासारखं…”, छोटा पुढारी व निक्कीची फुलतेय मैत्री, पाहा व्हिडीओ

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लोकप्रिय मराठी गायक व ‘बिग बॉस मराठी ३’चा स्पर्धक उत्कर्ष शिंदेने कमेंट केली आहे. “ही ड्यूटी नको, ती ड्यूटी नको, कधी बोलला ❌ शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान दिसला?❌ कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? ❌ कोणत्या मुलीचा अपमान केला?❌ गेममध्ये टिकण्यासाठी खोटं प्रेमाचं नाटक, रडणं, रुसणं, फुगणं, असं काही एक केलं का ❌ एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो, आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार” असं उत्कर्षने या प्रोमोवर कमेंट करत लिहिलं. याचबरोबर त्याने #surajbhid #fullsupport हे हॅशटॅगही वापरले.

उत्कर्ष शिंदेची कमेंट

utkarsh shinde
उत्कर्ष शिंदेने प्रोमोवर केलेली कमेंट

या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत सुरजचं कौतुक केलं व त्याच्यासाठी वोट करण्याचं आवाहन केलं. ‘गेम कळो न कळो पण आमच्या सुरज भाऊमुळे घरातल्या सर्व सदस्यांना माणसातील माणुसकी हे नक्कीच कळले असेल’, ‘दिलदार ओ बाकी काय नाही’, ‘त्यालाच म्हणतात महाराष्ट्रातील संस्कृती, काहीही असो सुरज भाऊ मनं जिंकली सगळ्यांची,’ ‘सुरज साधा भोळा आहे समजून घ्या त्याला’, ‘ज्याला माणसातला माणूस कळला तो सुरज चव्हाण’, ‘किती पण नॉमिनेशनमध्ये टाका तुम्ही पुर्ण महाराष्ट्र आहे सूरजच्या बाजूने’, सुरजने ‘अख्ख्या महाराष्ट्राची माणसं कमावली,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
suraj chavan cleaning house netizens commented
प्रोमोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स (फोटो- स्क्रीनशॉट)

‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.