Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्यात दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. दोन बाहुल्यांरुपी बाळांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. हा टास्क खेळण्यासाठी घरात दोन गट बनवण्यात आले होते. यामध्ये टीम A ने म्हणजेच निक्की, वैभव, सूरज, जान्हवी, घन:श्याम, अरबाज, इरिना या सदस्यांच्या टीमने या टास्कमध्ये बाजी मारली आहे.

‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) हा टास्क खेळण्यासाठी स्पर्धकांना काही नियम आखून दिले होते. या नियमांचं पालन करणं सदस्यांना बंधनकारक होतं. ते म्हणजे, दोन्ही टीम्सच्या हातात बाळ कायम असलं पाहिजे. याशिवाय बाळाचा रडायचा आवाज आला की, लगेच स्विमिंग पूलमध्ये एका सदस्याने उडी मारायची…त्यानंतर स्वच्छ होऊन लंगोट बदलायचं. भूक लागल्यावर टीममधील एका सदस्याने बाळासाठी पाठवलेलं जेवण एकट्याने पूर्ण संपवायचं. तसेच बाळ ज्या सदस्याच्या हातात असेल त्याने संवाद साधताना मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेचा वापर करायचा नाही.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हे लोक खरे परप्रांतीय”, अरबाज-वैभवचं मालवणी भाषेबद्दल वक्तव्य; मराठी अभिनेता संतापून म्हणाला, “देवा महाराजा…”

घरात बाहुल्यांरुपी बाळांना सांभाळण्याचा टास्क सुरू असताना घन:श्यामने संचालकांकडे अंकिताने त्याला हात मारल्याचा आरोप केला होता. यावर टास्क संपल्यावर अंकिताने धनंजय पोवार यांच्याकडे घन:श्यामबद्दल तक्रार केली. राग अनावर होऊन अंकिताने “मला घन:श्यामला कानाखाली मारलंसं वाटतंय” असंही म्हटलं आहे. कोकण हार्टेड गर्ल नेमकं काय म्हणाली आहे जाणून घेऊयात…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Season 5 ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

अंकिता धनंजय पोवार यांच्या संवाद साधताना म्हणाली, “घन:श्यामला खरंच मला मारावंसं वाटत होतं. त्याच्या एकाही शब्दावर मला विश्वास नाही. तो असा धावत होता ना…मला त्याला दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा वाटत होत्या.” अंकिताचं म्हणणं ऐकल्यावर धनंजय तिला शांत राहण्याचा सल्ला देतात. तसेच असे विचार मनात आणायचे नाहीत असंही ते अंकिताला सांगतात.

हेही वाचा : Video : श्रीदेवींच्या जयंतीनिमित्ताने लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंडसह नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

हेही वाचा : Salim Javed : ‘शोले’ लिहिणाऱ्या सलीम-जावेदचा प्रवास उलगडणारी डॉक्युमेंट्री ‘अँग्री यंग मेन’, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिताचा हा प्रोमो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांच्या घन:श्याम विरोधात संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. “अंकिता तू बिनधास्त भिड आम्ही आहोत”, “अंकिता ताई तू खूप चांगली खेळतेस”, “अंकिता संपूर्ण महाराष्ट्र तुझ्याबरोबर आहे” अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत. याशिवाय या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी अभिजीत सावंत, निखिल दामले, सूरज चव्हाण व योगिता हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.