‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रंगणार आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयाराही सुरु आहे. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या अभिनेत्री रुचिरा जाधवने धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे सर्वजण चकित झाले आहेत.

तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश आहे. यापैकी केवळ एका स्पर्धकाला बिग बॉस मराठीची मानाची ट्रॉफी मिळणार आहे. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दर्शवताना दिसत आहे. त्यातच आता अभिनेत्री रुचिरा जाधवच्या एक पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या पोस्टद्वारे रुचिराने बिग बॉसच्या खेळाची पोलखोल केली आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण? अवघ्या काही तासातच होणार घोषणा

बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या भागात बिग बॉसने यंदाच्या पर्वातील सर्व सदस्यांना घरात परत जाण्याची संधी दिली होती. त्यावेळी सर्वच स्पर्धक घरात परतले होते. यावेळी रुचिराही बिग बॉसच्या घरात गेली होती. त्यावेळी रुचिरा जाधवला अभिनेत्री राखी सावंतला भेटून प्रचंड आनंद झाला होता. तिला राखी सावंतचं वागणं प्रचंड आवडलं आणि तिने घराबाहेर पडताच तिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली.

“यंदाचे बिग बॉस मराठीचे पर्व राखी सावंतने जिंकावं असं मला वाटतंय. मी कालच तिला भेटले आणि त्या घरात तीच एकमेव आहे जी सगळ्यात खरी आहे. ती जशी आहे तशीच वागतेय”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याबरोबर तिने शेवटी ‘बाकी निर्माते ठरवतीलंच’, असे म्हणत इमोजीही शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा व्हिडीओ

रुचिराने या पोस्टच्या शेवटी लिहिलेल्या या वाक्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. रुचिराने बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल केल्याचे अनेकजण म्हणत आहे. तर काही जण मेकर्स ठरवतील याचाच अर्थ संपूर्ण खेळात कोण घरात राहणार आणि कोण जिंकणार हे निर्माते ठरवत असल्याचे म्हटले आहे. मनोरंजन मराठी ऑफिशिअल या इन्स्टाग्रामवर अकाऊंटने या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर अनेक नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यात एकाने निर्मात्यांनी आधीच विजेता ठरवला आहे, मिस नेमळेकर (जी अजिबात पात्र नाही) असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी ‘हिने तर एकदम सगळंच सांगून टाकलं. एवढं पण खरं बोलायचं नव्हतं. अरे म्हणजे खरंच निर्माते सगळं ठरवतात. आम्ही एवढे वोट करून काहीही उपयोग नसतो. प्रेक्षकांना मूर्ख बनवतात, अशा अनेक प्रतिक्रिया देत बिग बॉसवर ताशेरे ओढले आहेत.