Bigg Boss Marathi Season 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’चा दुसऱ्या आठवड्यातील भाऊचा धक्का नुकताच पार पडला. या आठवड्यात रितेश देशमुखने जान्हवी, अरबाज, वैभव या सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. याशिवाय वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने खास उपस्थिती लावली होती. अक्षयच्या येण्याने घरातील सदस्यांनी चांगलीच धमाल केली. तर, आज रितेश देशमुखने जान्हवीने निक्कीबद्दल केलेली चुगली सर्वांसमोर सांगितली. यामुळे घरात काहीवेळ नवीन ड्रामा पाहायला मिळाला. आता यानंतर निक्की – जान्हवीच्या मैत्रीत दुरावा येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातून दर आठवड्याला एक सदस्य स्पर्धेतून बाद होऊन घराचा निरोप घेतो. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला होता. यानंतर दुसऱ्या आठवड्यासाठी योगिता चव्हाण, घन:श्याम ( छोटा पुढारी), पंढरीनाथ, निखिल दामले, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे सदस्य नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमध्ये घरातून बेघर कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर तो क्षण येताच रितेश देशमुखने सगळ्या सदस्यांना आधी आनंदाची बातमी दिली आणि पुढे, नॉमिनेटेड सदस्यांना काहीसा धक्का दिला.

हेही वाचा : सुप्रिया पाठारेंनी शेअर केला लग्नातील Unseen फोटो अन् लिहिलं सुंदर कॅप्शन! मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस

रितेश देशमुखने सांगितला नवीन ट्विस्ट

रितेशने सर्वप्रथम सूरज चव्हाणला सेफ केलं. त्यानंतर निक्की, योगिता, निखिल यांना सेफ करून या आठवड्यात बॉटम दोनमध्ये पंढरीनाथ व छोटा पुढारी असल्याचं सांगितलं. परंतु, या आठवड्यात घराचा निरोप कोणीही घेतला नाही. ‘कलर्स मराठी’ एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याने सगळ्या घरातील सदस्यांना या एलिमिनेशनपासून सुटका देण्यात आली. असं रितेशने भाऊच्या धक्क्यावर सांगितलं.

रितेशने सगळ्या सदस्यांना सेफ केल्यावर एक नवीन ट्विस्ट सांगितला. हा ट्विस्ट म्हणजे या आठवड्यात नॉमिनेट असलेले ६ स्पर्धकच पुढच्या आठवड्यासाठी नॉमिनेट असणार आहेत…यात कोणताही बदल होणार नाही. निक्की या आठवड्यात नॉमिनेट होती… ती पुढच्या आठवड्यात सुद्धा नॉमिनेट असणार ही गोष्ट ऐकल्यावर निक्कीसह तिच्या मित्रमंडळींनी धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : योगिता चव्हाणला अश्रू अनावर; रितेशसमोर व्यक्त केली ‘बिग बॉस’ सोडण्याची इच्छा, पण…; नेमकं काय घडलं?

घरात कोण येणार नवीन पाहुणा?

आता पुढच्या आठवड्यात सुद्धा सूरज, निक्की, योगिता, निखिल, पॅडी आणि घन:श्याम हे सदस्य नॉमिनेटेड असणार आहेत. याशिवाय रितेश देशमुखने जाता जाता घरातल्या सदस्यांनी आणखी एक हिंट दिली. ती म्हणजे, उद्या तुमच्याकडे एक नवीन पाहुणा येणार आहे. या पाहुण्याची तुम्ही उत्तमप्रकारे काळजी घ्या असं रितेशने सर्व स्पर्धकांना सांगितला. आता हा नवीन पाहुणा नेमका कोण आहे? घरात कोणता टास्क होणार? ‘बिग बॉस मराठी’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री तर होत नाहीये ना? अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi फोटो सौजन्य : कलर्स मराठी
View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा सीझन आतापर्यंतच्या चार सीझनमध्ये सर्वाधिक रेटिंग्ज मिळवलेला आहे… अशी आनंदाची बातमी सुद्धा रितेश देशमुखने घरातील सर्व सदस्यांना दिली. आता येत्या तिसऱ्या आठवड्यात हे सगळे स्पर्धक मिळून काय कल्ला करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.