छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाने अखेर निरोप घेतला. अक्षय केळकर हा यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये मिळाले. यंदा बिग बॉसच्या घरात अक्षय केळकरच नव्हे तर अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, प्रसाद जवादे हे चेहरे चर्चेत राहिले. त्यातच आता किरण मानेंनी शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने हे पुन्हा फेसबुकवर सक्रीय झाले आहेत. टॉप ३ स्पर्धक ठरलेल्या किरण मानेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 Winner : विजेतेपदाचा मान पटकावल्यानंतर अक्षय केळकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “कमाल…”

तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रेमामुळेच इथवरचा प्रवास शक्य होता. सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार, असे किरण मानेंनी म्हटले. त्याबरोबर त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. यात त्यांनी एक मेसेज शेअर केला आहे.

“आज या किरण्याला हरण्याच्या दु:खापेक्षा मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं सुख लय मोठं हाय…! किरण माने”, असे त्यांनी यात म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावर त्यांचे अनेक चाहते विविध पोस्ट शेअर करत कमेंट करताना दिसत आहे.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…

दरम्यान यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक ठरले. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक होते. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.