‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या पर्वामध्ये स्पर्धकांमध्ये असलेली मैत्री, वाद, भांडण, राडे पाहायला मिळत आहेत. किरण माने व विकास सावंत हे दोघं तर पर्वाच्या सुरुवातीपासूनच एकत्र आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनीही पसंती दिली. विकास व किरण एकमेकांना उत्तम साथ देताना दिसले. पण आता यांच्या मैत्रीमध्ये फुट पडणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “…आणि त्या रात्री मी खूप रडलो” ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंचा अफेअरबाबत खुलासा

या आठवड्याच्या चावडीमध्ये सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांबरोबर एक टास्क खेळला. याच टास्कदरम्यानचाच एक व्हिडीओ कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकही विकासवर संतापले आहेत.

नेमकं काय घडलं?
महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना एक टास्क दिला होता. प्रत्येकाने आपल्या प्रतीस्पर्धकाला गद्दार या टॅग द्यायचा होता. यावेळी विकासने घेतलेला निर्णय सगळ्यांच्याच भूवया उंचावणारा होता. विकासने चक्क किरण माने यांना गद्दार टॅग दिला. यावेळी किरण यांनाही धक्का बसला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दादा ये” असं विकास किरण यांना म्हणतो आणि त्यांना गद्दार हा टॅग लावतो. त्यानंतर किरण यांनाही खूप वाईट वाटतं. विकास त्यांच्या समजुत काढायला जातो. पण “तू मला गद्दार हा टॅग दिला आहेस.” असं किरण त्याला म्हणतात. हा व्हिडीओ पाहून विकास तू चुकीचं केलं असल्याचं प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून म्हणत आहेत.