"मी आदर्श असल्याचा मुखवटा..." 'बिग बॉस'च्या घरात दाखल होताच किरण मानेंची पहिली पोस्ट | Bigg Boss Marathi Season 4 kiran mane facebook post after enter in bigg boss house nrp 97 | Loksatta

“मी आदर्श असल्याचा मुखवटा…” ‘बिग बॉस’च्या घरात दाखल होताच किरण मानेंची पहिली पोस्ट

“एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडणार”, असेही किरण माने म्हणाले

“मी आदर्श असल्याचा मुखवटा…” ‘बिग बॉस’च्या घरात दाखल होताच किरण मानेंची पहिली पोस्ट
"एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडणार", असेही किरण माने म्हणाले

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. नुकतंच त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात धमाकेदार एंट्री घेतली. त्यानंतर त्यांनी धमाकेदार फटकेबाजी करत सिनेसृष्टीतील कलाकारांवर टीकाही केली. बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध गोष्टींवर त्यांचे मत मांडताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात हजेरी लावल्यानंतर किरण मानेंनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रसिक प्रेक्षकांना आवाहन केले आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी 

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

…माझा इस्वास हाय तुमी माझी साथ सोडनार नाय ! मानूस हाय मी, माणसासारखा वागनार तिथं. मनापास्नं. कुठलंच ढोंग नाय करनार. खेळ हाय त्यो. स्विकारलाय तर जीव लावून खेळनार. ढिला पडनार नाय. हसनार, हसवनार, चिडनार, चिडवनार, भांडनार, वाद घालनार, मैत्री केलीच तर ‘दिल से’ करनार…ती निभावनार. एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडनार.

…गावाकडचा गडी हाय. शेतकरी कुटूंबातला. रानात फिरलेला, ढेकळं तुडवलेला. नदीत,विहिरीत पोहलेला. एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायचा जिवापाड प्रयत्न करावा लागनारंय दोस्तांनो. ‘शिवी’ ! ‘शिवी’ हा आमच्या बोलीतला अविभाज्य भाग हाय. त्या शिव्यांचा अर्थ नस्तो डोक्यात. एक एक्सप्रेशन म्हनून ती बाहेर येती एवढंच. आवो आमी तर लै छोटी मान्सं, आमच्या पहाडासारख्या तुकोबारायाच्या अभंगातबी तुमाला शिव्या सापडत्याल. निव्वळ मनातली भडास व्यक्त करन्याचं साधन म्हनून शिवी येती तोंडात. पन त्याचा तिथं ‘इश्यू’ हुईल.. माझ्याविरूद्ध शस्त्र म्हनून वापर हुईल, हे म्हायतीय मला. कारन मी बी लै शिवराळ हाय. भांडताना मला त्या सवयीवर लगाम घालायला लागनार… ते करीन.

…माझ्या भावांनो आनि बहिनींनो, मी तुमचं मनोरंजन करन्यात कनभरबी कमी पडनार नाय. माझ्याकडनं चुका झाल्या तर त्या पोटात घ्याल तुमी हे बी म्हायतीय मला.

मला एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय. मी तुकोबारायांवर कायम लिहीत असतो. तुकोबा माझ्या श्वासात हाय. मी गौतम बुद्धांवर व्याख्यान देतो. छ. शिवराय, छ. शंभूराजे यांच्यावर व्याख्यानं देतो. महाराष्ट्रातल्या गांवोगांवी जाऊन महात्मा फुले, लोकराजा शाहू महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करतो. या सगळ्या महामानवांचे विचार माझ्या रक्तात हायेत. पन एक लक्षात ठेवा, सामान्य मानूस ज्या चुका करतो, त्या माझ्याकडनं बी होत्यात. मी आदर्श असल्याचा मुखवटा घालून नाय खेळनार. अभिनेता, सेलिब्रिटी म्हनून ‘बिग बाॅस’सारख्या शो मध्ये जाताना मी केवळ एक त्या शो चा खेळाडू म्हनून खेळीन. “बाहेर व्याख्यानांत महामानवांवर बोलतो आनि शो मध्ये बघा कसा भांडतोय.” असा गोंधळ करून घेऊ नका. मी बिग बाॅसच्या घरात केवळ या शो च्या ‘फाॅरमॅट’चं पालन करून खेळनारा एक खेळाडू असेन. खेळाडू, एक अभिनेता म्हनूनच माझ्याकडं बघा आनि शो चा आनंद घ्या, असे किरण मानेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 Grand Premiere Live : ‘शेवंता’ फेम अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस’ मराठीमध्ये होणार सहभागी, वाचा संपूर्ण यादी

दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रँड प्रिमियरमध्ये बिग बॉसच्या १६ सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली. यात किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अमृता घोंगडे, प्रसाद जवादे, तेजस्विनी लोणारी यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Bigg Boss Marathi 4 : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही…” बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकरांचं वक्तव्य

संबंधित बातम्या

Akshaya Hardeek Wedding : “दाजींना घेऊन येतोय” मित्रच राणादाला पाठकबाईंच्या घरी घेऊन गेला, अक्षया म्हणते…
“तुम्ही एक तासाचा भाग बघताय आणि…” बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत
Video : “तुला प्रेमाने…” घराच्या खिडकीमध्ये आलेल्या कावळ्याशी गप्पा मारतेय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, तुम्हालाही हसू होईल अनावर
Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल
Bigg Boss 16 : “आता राडा होणार” पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरेला पाहून घरातील सदस्यही हैराण, अंगावरील सोनं पाहिल्यानंतर म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा