Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात एक अशी सदस्य आली, जिने हिंदी ‘बिग बॉस गाजवलं होतं; ती म्हणजे निक्की तांबोळी ( Nikki Tamboli ). निक्कीने ‘बिग बॉस’चं नव्हे तर ‘खतरों के खिलाडी ११’, ‘दी खतरा खतरा’ यांसारखे शो केले आहेत. तसंच तिने काही चित्रपटांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. निक्कीने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून केली होती. आज निक्की ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात जबरदस्त खेळताना दिसत आहे.

सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या पर्वाच्या सुरुवातीपासून निक्की तांबोळी ( Nikki Tamboli ) चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून निक्की सतत कोणाशी ना कोणाशी वाद घालताना पाहायला मिळाली. असं असलं तरी तिने आपल्या खेळाने, स्ट्रॅटजीने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे आता ती शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi: राखी सावंत, अभिजीत बिचुकलेनंतर ‘बिग बॉस’मध्ये अनिल थत्तेंची एन्ट्री! निक्कीचं कौतुक, तर वर्षा उसगांवकरांना म्हणाले…

अनेकजण निक्की ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची विजेती व्हावी, अशी इच्छा व्यक्त करताना सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या शर्यतीत असलेल्या निक्कीने बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबर ( Nawazuddin Siddiqui ) काम केलं होतं, हे तुम्हाला माहितीये का? एका चित्रपटात निक्कीने ( Nikki Tamboli ) नवाजुद्दीनबरोबर आयटम साँग केलं होतं; ज्याला मिलियनहून अधिक व्ह्यूज होते.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी ५’नंतर इरिना रुडाकोवाला मिळाली मोठी संधी, झळकली ‘या’ लोकप्रिय मालिकेत

नवाजुद्दीन सिद्धिकी आणि नेहा शर्माची प्रमुख भूमिका असलेला ‘जोगीरा सारा रा रा’ चित्रपट २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटात निक्कीने ( Nikki Tamboli ) ‘कॉकटेल’ नावाचं आयटम साँग केलं होतं. या गाण्यात ती नवाजुद्दीनबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसली होती.

हेही वाचा – Video: अभिजीत सावंतच्या लव्हस्टोरीला ‘अशी’ झाली होती सुरुवात, बायकोला ‘हे’ दिलं होतं पहिलं गिफ्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निक्की तांबोळी फायर”, “निक्कीने तिच्या स्टेप्सनी घायाळ केलं”, “निक्की ( Nikki Tamboli ) तुझा परफॉर्मन्स जबरदस्त होता”, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया या गाण्यावर निक्कीच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.