Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर या सात जणांमधील एक सदस्य ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचं याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

रविवारी, पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट झाला. कमी मतांमुळे पंढरीनाथची अंतिम फेरीपर्यंत जाण्याची संधी थोडक्यासाठी हुकली. पण अनेकांनी या एलिमिनेशनवर नाराजी व्यक्त केली आहे. पंढरीनाथच्या ऐवजी जान्हवी किल्लेकर घराबाहेर जायला पाहिजे होती, असं म्हणत आहेत. अशातच सूरज चव्हाणचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये सूरज पंढरीनाथच्या आठवणीत भावुक झाला आहे.

हेही वाचा – पंढरीनाथ कांबळे ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर जिवलग मैत्रीण विशाखा सुभेदारची पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

‘सिने मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर सूरज चव्हाणचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो पंढरीनाथ कांबळेच्या आठवणीत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. तसंच जिद्दीने बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, असं विधान सूरजने केलं आहे.

या प्रोमोध्ये सूरज म्हणतोय की, पॅडी दादा गेल्यामुळे माझं मन भरून आलं. डोळ्यातून पाणी आलं. कसं आहे ना, आपल्या जवळचा माणूस गेल्यावर लय वाईट वाटतं. पण या घरात असं आहे की एकट्यासाठी लढायचं आहे आणि ते मी प्रयत्न करणार. मी खचणार नाही. जिद्दीने उभा राहणार आणि ‘बिग बॉस’ची ट्रॉफी सूरज चव्हाणचं जिंकणार. झापुक झुपूक पॅटर्नमध्येच घरी नेणार.

हेही वाचा – लठ्ठपणावरून ट्रोल करणाऱ्यावर अक्षया नाईक संतापली, मुंबई पोलिसांना टॅग करत म्हणाली, “ही व्यक्ती इतकी…”

हेही वाचा – “तुमची तोंडं कोण बघणार…”, अभिजीत बिचुकलेंनी ७० दिवसांत ‘बिग बॉस’ संपवण्याबद्दल लगावला टोला, म्हणाले, “घमंड, उद्धटपणा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूरज चव्हाणच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सूरज तू टेन्शन नको घेऊ महाराष्ट्रातील सर्व जनता तुझ्याबरोबर आहे”, “अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे. तू काळजी करू नकोस. तुला जिंकून देणार आहे”, “तू घाबरू नको”, “सूरज भावा तू नड…भीड आम्ही तुला पाठिंबा द्यायला आहोत”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.