Bigg boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे टॉप पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. आरोह वेलणकरने खेळातून एक्झिट घेतल्यानंतर त्याचा घरातील प्रवास संपुष्टात आला आहे. अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यंदाच्या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत.

टिकट टू फिनालेचा टास्क जिंकत अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची फायनलिस्ट ठरली. अपूर्वा पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. केवळ एकच दिवस उरला आहे आणि लवकरच या खेळाचा विजेता जाहीर करण्यात येणार आहे. प्रेक्षक तसेच चाहत्यांचं बहुमत अपूर्व नेमळेकरच्या बाजूला झुकणार असं दिसत आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण? अवघ्या काही तासातच होणार घोषणा

अभिनेत्री स्मिता गोंदकरनेसुद्धा यंदाच्या पर्वाची विजेत अपूर्वा नेमळेकरच असेल असं तिच्या कानावर आल्याचं स्पष्टपणे जाहीर केलं आहे. यामुळे ‘शेवंता’चे चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत. तिला जिंकवण्यासाठी ते हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. मुंबईतील बऱ्याच ठिकाणी अपूर्वासाठी केलेल्या बॅनरबाजीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपूर्वानेही याचा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ओंकार भोजनेची धमाकेदार एन्ट्री; कार्यक्रमात विनोदाची आतिषबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठमोठे बॅनर तर काही ठिकाणी पोस्टर्स हाती घेऊन चाहते ‘भरघोस मतदान करून अपूर्वाला विजयी करा’ असं आव्हान करताना दिसत आहेत. २ ऑक्टोबरला ‘बिग बॉसचं पर्व ४’ सुरुवात झालं होतं. १६ स्पर्धकांबरोबरचा हा प्रवास आता अंतिम टप्प्यापर्यंत आला आहे. बिग बॉसच्या घरात शिरल्यापासूनच अपूर्वाची खेळी प्रेक्षकांना पसंत पडली. आता ८ जानेवारीला या पर्वाची विजेती अपूर्वा होणार की आणखी कोण याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.