‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामधील स्पर्धकांमध्ये सध्या वाद, भांडणं सुरु आहेत. खेळ पुढे जात असताना स्पर्धकांमधील नात्यांची गणितंही बदलताना दिसत आहेत. घरातील वातावरण थोड्या फार प्रमाणत तापलं असताना ‘बिग बॉस’ने शोमध्ये नवा ट्विस्ट आणला. एकाच वेळी चक्क दोन स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचं ‘बिग बॉस’ने सांगितलं. त्यानंतर घराबाहेर जाणाऱ्या दोन स्पर्धकांची नावं घोषित करण्यात आली.

आणखी वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

यशश्री मसुरकर ४९ दिवसांनंतर घराबाहेर गेली. त्यानंतर किरण मानेही घराबाहेर जाणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं. पण अद्यापही ते या खेळाच्या बाहेर गेले नाहीत. ‘बिग बॉस’ने त्यांना विशेष अधिकार देत सीक्रेट रूममध्ये ठेवलं आहे.

पण यशश्री या खेळाच्या बाहेर गेली आहे. तिच्यासाठी हा संपूर्ण प्रवास काही सोपा नव्हता. ‘बिग बॉस’च्या पहिल्या आठवड्यामध्ये यशश्री स्वतःमध्येच हरवलेली दिसली. पण त्यानंतर हा खेळ कसा खेळला पाहिजे हे गणित तिला समजत गेलं. तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही या शोमध्ये भाष्य केलं. घरामधून बाहेर आल्यानंतर ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने अपूर्वा नेमळेकरबाबत एक विधान केलं आहे.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुला कोणत्या सदस्याचं तोंडही यापुढे पाहायला आवडणार नाही असं यशश्रीला या मुलाखतीत विचारण्यात आलं. तेव्हा ती क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली, “यापुढे मला अपूर्वा नेमळेकरचं तोंडही बघायचं नाही.” म्हणजेच यशश्रीचं अपूर्वाशी घरात फारसं जमलं नाही पण नंतरही तिला मैत्री ठेवायची नसल्याचं यामधून स्पष्ट होत आहे.