Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नुकताच योगिता चव्हाणने निरोप घेतला. घरातले वाद, भांडणं पाहून अभिनेत्रीने स्वत:हून बाहेर जाण्याची मागणी केली होती. ‘बिग बॉस’च्या घरात असताना योगिताने एका प्रसंगात मी इकडे येण्यापूर्वी सौरभचं म्हणजेच नवऱ्याचं ऐकलं पाहिजे होतं असं वक्तव्य केलं होतं. याबद्दल अभिनेत्रीला ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला. याबाबत योगिता काय म्हणाली जाणून घेऊयात…

योगिताला सौरभने दिलेला खास सल्ला

योगिता म्हणाली, “घरात निक्की वगैरे वैयक्तिक विषयावरून खूप बोलायचे. त्यामुळे त्या क्षणाला मला नवऱ्याची खूप आठवण आली. माझ्यासारखं बऱ्याच लोकांना आपण कसे आलो इथे…या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या. मी सुद्धा खंबीर राहण्याचा खूप प्रयत्न केला आणि ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.”

योगिता पुढे म्हणाली, “घरात जाताना मला सौरभने एकच सांगितलं होतं ते म्हणजे, तुझ्या मानसिक आरोग्याला घातक ठरेल असं काहीच करू नकोस. शो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पण, तुझं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे. कोणत्याही क्षणी तुला वाटलं की हे मला सहन होत नाहीये तर, तेव्हाच तू ताबडतोब मदत मागून घे. तू सहन करू नकोस.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi-अरबाज अन् निक्कीमध्ये जोरदार भांडण! आदळआपट करत काढला राग; नेटकरी म्हणाले, “बाई किती ते नाटक…”

“बिग बॉसकडे ( Bigg Boss Marathi ) मी मदत मागितली आणि ते लोक सर्वांना मदत करतात. मी बाहेर आल्यावर तो आनंदी होता. कारण, बाहेर तो एकटाच असा होता ज्याला कळत होतं की, आत मला नेमकं काय वाटतंय. मी काय सहन करतेय. बाकी घरच्यांना वाटत होतं अरे ती खेळेल, टास्क खेळतेय म्हणजे करेल. माझी सासू, बहीण, मैत्रिणी सगळेजण खेळू देत तिला…असंच म्हणत होते. पण, सौरभला माझी अवस्था काय झाली असेल याचा पुरेपूर अंदाज होता.” असं योगिताने सांगितलं.

हेही वाचा : “टास्कमध्ये कपडे खेचणं कितपत योग्य?” निक्की अन् जान्हवी ‘डर्टी गेम’ खेळतात; घराबाहेर येताच योगिता चव्हाणचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
yogita chavan
Bigg Boss Marathi योगिता चव्हाण ( फोटो सौजन्य : yogita chavan इन्स्टाग्राम )

दरम्यान, योगिता व निखिल एकत्र घराबाहेर गेल्याने गेल्या आठवड्यात डबल एविक्शन पाहायला मिळालं होतं. आता या आठवड्यात ( Bigg Boss Marathi ) घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी कोण नॉमिनेट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.