पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन आता बिग बॉस १६ चा विजेता झाला आहे. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर स्टॅन सातत्याने चर्चेत आहे. अखेरच्या क्षणी मराठमोळ्या शिव ठाकरेला मात देत एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. दरम्यानच्या १९ आठवड्यांमध्ये त्याने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. शोमध्ये तो नेहमीच त्याच्या फॅशन, स्टाइल आणि हिऱ्याची चेन या गोष्टींमुळे चर्चेत राहिला. अनेकांना तर त्याच्या गळ्यातली हिऱ्याची चेन खरी आहे का असाही प्रश्न पडला होता. पण आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः फराह खाननेच दिलं आहे.

बिग बॉस १६ संपल्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माती फराह खानने घरातील सर्व सदस्यांना मोठी पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये अब्दु रोजिक, साजिद खान, शिव ठाकरे, अर्चना गौतम, निमृत, शालीन आणि एमसी स्टॅन सहभागी झाले होते. या पार्टीतील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात हे सगळे सदस्य धम्माल मस्ती करताना दिसत आहे. या पार्टीनंतर फराह खानने स्टॅनबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याच्या हिऱ्याच्या चेनबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा- एमसी स्टॅनचं नाव ऐकताच प्रियांकाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, ट्रोल करत नेटकरी म्हणाले…

फराह खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एमसी स्टॅनबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने कोट्यवधी लोकांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या फोटोसह तिने एक कॅप्शन दिलं आहे ज्यावरून हे स्पष्ट होतंय की एमसी स्टॅन जी चेन घालतो ती खऱ्या हिऱ्यांची आहे. एमसी स्टॅनबरोबरचा फोटो शेअर करताना फराहने लिहिलं, “मी तपासून पाहिलं आहे. हे हिरे खरंच खरेखुरे आहेत अगदी स्टॅनसारखेच”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
farah khan instagram

बिग बॉस १६चं विजेतेपद जिंकल्यानंतर एमसी स्टॅनला ट्रॉफीबरोबरच इतर बरीच बक्षीसं मिळाली आहेत. त्याला ३१ लाख ८० हजाराची कॅश प्राइज आणि एक ह्युंदई ग्रँड आय १० नियोस कार मिळाली आहे. दरम्यान बिग बॉस फिनालेच्या अखेरच्या पाच स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन यांना जागा मिळाली होती. त्यानंतर शालीन आणि अर्चना घरातून एलिमिनेट झाले. तर प्रियांका, शिव आणि स्टॅन टॉप ३ स्पर्धक ठरले होते.