‘मास्टरशेफ इंडिया’ या लोकप्रिय कार्यक्रमातला परीक्षक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरचा आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट झाला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून कुणालने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी हायकोर्टाने पत्नीवर केलेल्या क्रूरतेच्या आरोपावर आधारित घटस्फोटाची याचिका मंजूर केली. शिवाय कुणालला पत्नीकडून मिळणारी वागणूक ठीक नसल्यामुळे हायकोर्टाने घटस्फोट घेण्यास परवानगी दिली.

माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी कुणालच्या पत्नीने त्याचा अपमान केला होता. पत्नीकडून ही मिळणारी वागणूक क्रूरतेप्रमाणे असल्याचं हायकोर्टाने सांगितलं. हायकोर्टाने म्हटलं की, कुणालच्या पत्नीचे वर्तन चांगले नाही. तिला पतीच्या प्रतिष्ठेची काळजी नाही आणि तसेच त्याच्या प्रति सहानुभूती देखील नाही. कोर्टाच्या मते, जेव्हा पती-पत्नीमधील एकाची वृत्ती अशी असते तेव्हा त्याचा परिणाम नात्यावर होता. त्यामुळे एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही.

हेही वाचा – निळू फुलेंचे जावई झळकले लोकप्रिय मालिकेत, साकारतायत ‘ही’ महत्त्वाची भूमिका

कुणाल कपूरने याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात धाव घेण्यापूर्वी फॅमिली कोर्टात (कौटुंबिक न्यायालय) याचिका दाखल केली होती. पण फॅमिली कोर्टाने कुणालची याचिका फेटाळली. यावरही हायकोर्टाने आपले मत मांडले. हायकोर्ट म्हणाले, “पत्नीचे वर्तन विवाह कायद्याच्या कलम १३ (१) अंतर्गत येते. त्यामुळे फॅमिली कोर्टाने कुणालची घटस्फोटाची याचिका फेटाळून चुकी केली.”

हेही वाचा – निलेश साबळे, भाऊ कदम अन् ओंकार भोजने येणार एकत्र, महाराष्ट्राला खळखळून हसवणार; कधी, कुठे जाणून घ्या…

दरम्यान, कुणाल कपूरचा जन्म व शिक्षण दिल्लीत झालं आहे. बालपणापासूनच कुणालला जेवण बनवण्याची आणि नवनवीन पदार्थ करायची खूप आवड होती. आजही कुणाला आपल्या युट्यूब आणि सोशल मीडिया अकाउंटवर नवनवीन पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ शेअर करत असतो.