हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शहरात राहिलेल्या मुली गावाकडील संस्कृतीला आपलंस कसं करणार? यावर या कार्यक्रमाची थीम आधारित आहे. ‘जाऊ बाई गावात’मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच विविध ट्विस्ट येत असतात. लवकरच या शोच्या माध्यमातून एका लोकप्रिय अभिनेत्याचं कमबॅक होणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे घराघरांत लोकप्रिय झाला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आजारपणामुळे मनोरंजन विश्वापासून दूर होता. तपासणीमध्ये सागरला अ‍ॅसिडिटी झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ‘चला हवा येऊ द्या’चे चाहते सागर कारंडेला पोस्टमन काकांच्या रुपात शोमध्ये परत बोलवा अशी मागणी करत होते. परंतु, प्रेक्षकांच्या लाडक्या पोस्टमन काकांनी ‘जाऊ बाई गावात’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.

हेही वाचा : “तेव्हा फार कंटाळलो…”, अंशुमन विचारेने सांगितलं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचं खरं कारण, म्हणाला…

‘जाऊ बाई गावात’मध्ये सागर कारंडे पुन्हा एकदा पत्र वाचन करून हार्दिक जोशीसह स्पर्धकांना भावुक करणार आहे. यावेळी सागरने हार्दिकसाठी त्याच्या वहिनीने लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. वहिनीचं आभासी पत्र ऐकून हार्दिकला अश्रू अनावर झाले होते. एवढ्या महिन्यांनी पोस्टमन काकांच्या रुपात सागरला पुन्हा एकदा पाहिल्यावर प्रेक्षक आनंदी झाले आहेत.

हेही वाचा : Video : वैभव मांगलेंनी मुलांसाठी बनवले खास पराठे! व्हिडीओमध्ये सांगितली रेसिपी; नेटकरी म्हणाले, “तुमची पाककला…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘झी मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सागर परत ये हवा येऊ द्या मध्ये…अरविंद जगताप यांच्या पत्राला तुझाच आवाज शोभतो”, “किती दिवसांनी सागरचा आवाज ऐकतेय”, “सागर कारंडे इज बॅक” अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.