Delnaaz Irani on Marriage: अभिनेत्री डेलनाज इराणीने टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने काही बॉलीवूड चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.
अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. लनाज इराणी गेल्या अनेक वर्षांपासून पर्सी करकरियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
लग्न करण्यापेक्षा हे जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात. ती पर्सीपेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे. या कारणामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला आहे. मात्र डेलनाज अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्यावर भर देते.
डेलनाज आणि राजीव पॉल यांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र १४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर डेलनाज पर्सीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा पर्याय का निवडला? यावर वक्तव्य केले आहे.
“तो माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी…”
डेलनाज इराणीने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “पर्सीचासुद्धा घटस्फोट झाला आहे. त्याला देखील त्रास सहन करावा लागला. आम्ही जेव्हा नात्यात आलो तेव्हा तो लग्नाबद्दल खूप उत्साही होता. पण, काही शंकासुद्धा मनात होत्या. तो माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या खचलेले असतो आणि तेव्हा तुमच्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येते, त्यावेळी त्याला समजून घेण्यासाठी आणि पुन्हा एखाद्या नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी वेळ लागतो.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “स्वतःला सावरण्यासाठी आणि पुन्हा एखाद्यावर प्रेम करण्यासाठी खूप धाडस लागते. मी नेहमीच म्हणते की आपल्या नात्याला लेबल लावले जाऊ नये, कारण ते खूप पवित्र आहे. पर्सीचे संपूर्ण जगच मी आहे. त्याच्यासाठी मी अभिनेत्री किंवा इतर कोणीही नाही. तो मी जशी आहे, तसे मला स्वीकारतो.”
डेलनाझ पुढे म्हणाली, “तो एका देवदूतासारखा आहे. ज्याने माझी काळजी घेतली, माझे हसू त्याने परत आणले. मला आनंद दिला, मला आधार दिला आणि मला ज्या गोष्टींची भीती वाटायची ती त्याने दूर केल्या. त्याने मला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवले. त्यामुळे या नात्याला नाव देणे निरर्थक वाटते. तो माझा जीवनसाथी आहे.”
अभिनेत्री म्हणाली, “मी कागदपत्रावर सही केली तरी काहीही बदलणार नाही. कारण माझ्यासाठी तो आधीच माझा नवरा आहे. माझे हृदय आणि आत्मा पर्सीसोबत आहे.”
डेलनाज असेही म्हणाली की विवाह प्रमाणपत्र महत्वाचे नाही. जो व्यक्ती माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभा आहे, तो महत्वाचा आहे.
