Devmanus Fame Actor Kiran Gaikwad & Vaishnavi Kalyankar : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘देवमाणूस’चे यापूर्वीचे दोन सीझन सुपरहिट ठरले होते. यामुळेच ‘झी मराठी’ वाहिनीने या मालिकेच्या तिसरा सीझनची घोषणा केली. ‘देवमाणूस’ या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अभिनेता किरण गायकवाडचा चेहरा येतो. त्याने या मालिकेत दमदार खलनायकाची भूमिका साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाला. अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी त्याने लग्न केलं. ‘देवमाणूस’ मालिकेच्या निमित्तानेच या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये छान मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.१४ डिसेंबर २०२४ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार किरण-वैष्णवीच्या लग्नाला गेले होते. त्यांच्या लग्नातील बरेच फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

यंदा वैष्णवी कल्याणकरची पहिली वटपौर्णिमा होती. यानिमित्ताने नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर करत वैष्णवीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “खरंच मी खूप नशिबवान आहे की, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात… कारण, तुम्ही टिपिकल नवरा नाही तर माझे मित्र पण आहात… असा मित्र जो मला खूप समजून घेतो… अणि त्यामुळेच लग्नानंतरचं आयुष्यही खूप सुंदर वाटतंय… Love You किरण गायकवाड.” असं वैष्णवीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वैष्णवी कल्याणकरने शेअर केलेल्या या पोस्टवर किरण गायकवाडने कमेंट करत, “लव्ह यू बायको” असं म्हटलं आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर किरण आणि वैष्णवी यांनी एकत्र ‘देवमाणूस २’ या मालिकेत काम केलं होतं. यानंतर वैष्णवी ‘तिकळी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. याशिवाय किरण सध्या ‘देवमाणूस-मधला अध्याय’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकांसह अनेक चित्रपटांमध्येही तो झळकला आहे.