Kanica Maheshwari Neo Sannyas : २०११ मध्ये ‘दीया और बाती हम’ नावाची एक मालिका आली होती. या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय या गोष्टी प्रेक्षकांना खूप भावल्या होत्या. ही मालिका हिट ठरली होती आणि तिने जवळजवळ पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं.

मालिकेत संध्या राठीच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका सिंह होती. तर अनस रशीदने सूरजचे पात्र केले होते. मीनाक्षी राठीची भूमिका अभिनेत्री कनिका माहेश्वरीने केली होती. २०१६ मध्ये ही मालिका संपली. त्यानंतर, त्यातील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय झाले. हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. तर काही कलाकार मात्र छोटा पडदा व सोशल मीडिया दोन्हीपासून दूर राहिले. अशीच एक म्हणजे अभिनेत्री कनिका माहेश्वरी होय.

‘दीया और बाती हम’ संपल्यावर कनिका माहेश्वरीने दुसरी मालिका केली नाही. आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती म्हणतेय की तिने ३ वर्षांपूर्वी ओशो आश्रमात नियो संन्यास घेतला. ती सहा महिने ओशो आश्रमात राहिली. नियो संन्यास म्हणजे काय, हेही कनिका माहेश्वनीने सांगितलं.

कनिका माहेश्वरीने घेतला नियो संन्यास

केके एंटरटेनमेंटने कनिकाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्या हातात एक माळ दिसत आहे. हातात असलेली ही माळ संन्यासाची आहे, ओशोची आहे, असं कुनिका सांगतेय. “मी ३ वर्षांपूर्वी त्यांच्याकडून नियो संन्यास घेतलाय”, असं कुनिका म्हणाली.

नियो संन्यास म्हणजे काय?

कनिकाने स्वतः नियो-संन्यासचा अर्थ सांगितला. “नियो संन्यास म्हणजे जाणीवपूर्वक जगणं होय. जसे की आत्ता, मी तुमच्याबरोबर बसून बोलत आहे, म्हणून मी फक्त इथे आहे आणि इतर कुठेही माझं लक्ष नाही. आणि जर आपण या पद्धतीने आयुष्य जगू लागलो तर… आपण जाणीवपूर्वक जगू लागलो, की जर मी चहा पीत असेन, तर मी फक्त चहा पीत असेन, जर मी कोणाबरोबर असेलन, तर मी तिथेच आहे. त्यामुळे खूप फरक पडतो,” असं कनिकाने नमूद केलं.

ओशो आश्रमात ६ महिने राहिली कनिका

कनिका व्हिडीओमध्ये पुढे म्हणाली, “संन्यास घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ओशो आश्रमात जावं लागतं. तिथे ७-८-९ दिवसांचा एक कोर्स असतो ज्यात तुम्ही क्रिया करता. त्यानंतर, तुम्हाला आतूनच ही जाणीव होते की तुम्हाला या माळेची गरज आहे की नाही. अनेक प्रकारच्या क्रिया आहेत. मला हे खूप आवडलं आणि मी सुमारे ६ महिने त्या क्रिया केल्या. माझ्या मैत्रिणीने मला वारंवार आश्रमात येण्यास सांगितलं. तुला ते आवडेल असं ती म्हणायची. त्यामुळे मी नेपाळला गेले आणि तिथेच राहिले. मी त्यांचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर, मला वाटलं की मला या माळेची गरज आहे.”

कनिकाने कहानी घर घर की, राजा की आएगी बारात, कभी आये ना जुदाई, विरासत, गीत – हुई सबसे पराई या मालिकांमध्ये काम केलं आहे. कनिकाने २०१२ मध्ये अंकुर घईशी लग्न केलं.