scorecardresearch

Video: चाहत्याने लपून शूट केला उर्फी जावेदचा व्हिडीओ, अभिनेत्रीने पाहिलं अन्…

Video: चाहत्याने लपून शूट केला उर्फी जावेदचा व्हिडीओ, अभिनेत्रीला कळल्यावर पुढे काय झालं पाहा

urfi javed video
उर्फी जावेदचा व्हिडीओ चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अतरंगी कपड्यांमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांमधील उर्फीचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी वायर, कधी सुतळ तर कधी कपड्यांना कातरी लावत अतरंगी ड्रेस बनवणारी उर्फी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या उर्फीचा व्हिडीओ एका चाहत्याने शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. उर्फीने सेटवर कोणीही व्हिडीओ शूट करणार नाही, याची खबरदारी घेण्याची सक्त ताकीद तिच्या टीमला दिली होती. परंतु, एका चाहत्याने कोणाचंही लक्ष नसताना लपून उर्फीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला. उर्फीला ही गोष्ट समजताच तिने चाहत्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. उर्फीचा सेटवरील हा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> सत्यजीत तांबेंनी शेअर केला ओंकार भोजनेच्या कवितेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले “मित्रा…”

चाहत्याने लपून व्हिडीओ बनवल्याचं समजताच उर्फीने त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला. व्हिडीओ शूट केला नसल्याचं चाहत्याने सांगितल्यावर उर्फीने त्याचा मोबाईल टीमधील सदस्याला तपासण्यास सांगितलं. तेव्हा चाहत्याने खरंच व्हिडीओ शूट केल्याचं उघड झालं. त्यानंतर उर्फीने मोबाईलमधील व्हिडीओ ताबडतोब डिलीट करण्यास सांगितलं. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> Video: “जान, वापस आ जाओ” राखी सावंतने पती आदिलसाठी कॅमेऱ्यासमोरच फोडला टाहो, म्हणाली “लग्नानंतर पहिल्या रमझानमध्ये…”

उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अतरंगी कपड्यांमधील व्हिडीओबरोबरच ती समाजातील घडामोडींवरही भाष्य करताना दिसते. ट्वीटर व इन्स्टाग्रामवरुन उर्फी व्यक्त होत असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 09:51 IST