scorecardresearch

सत्यजीत तांबेंनी शेअर केला ओंकार भोजनेच्या कवितेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले “मित्रा…”

ओंकारच्या कवितेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

satyajeet tambe shared onkar bhojane video
सत्यजीत तांबेंनी शेअर केला ओंकार भोजनेचा व्हिडीओ. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी अभिनेता ओंकार भोजने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ओंकारने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धी मिळवलेल्या ओंकारने ‘फू बाई फू’ या कार्यक्रमामधूनही प्रेक्षकांना पोट धरु हसायला भाग पाडलं. सध्या ओंकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार कविता म्हणताना दिसत आहे.

ओंकारच्या “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची” या कवितेची भूरळ सत्यजीत तांबेंनाही पडली आहे. सत्यजीत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ओंकारच्या कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची…कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर ओंकारच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> Video: तुरुंगात असलेल्या पतीकडून राखी सावंतला धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “डॉनला…”

हेही वाचा>> काँग्रेसबाबत चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर कंगना रणौतने राहुल गांधींची उडवली खिल्ली; लहान मुलाशी तुलना करत म्हणाली “ओले ओले…”

ओंकार भोजनेच्या या कवितेचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात ओंकारने ही कविता म्हणून दाखविली होती. या कवितेमुळे ओंकारचं सर्वत्र कौतुकही होताना दिसत आहे. ओंकारची ही कविता त्याच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरली आहे.

हेही वाचा>> काँग्रेसबाबत चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर कंगना रणौतने राहुल गांधींची उडवली खिल्ली; लहान मुलाशी तुलना करत म्हणाली “ओले ओले…”

छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहोचलेल्या ओंकारने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. ओंकार मुख्य भूमिकेत असलेला ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट २० जानेवारीला प्रदर्शित झाला. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू न शकला नाही. याआधी ओंकार ‘बॉईज २’, ‘बॉईज ३’ आणि ‘घे डबल’ या चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 08:46 IST
ताज्या बातम्या