प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे सध्या मराठी सिनेसृष्टीत एक चर्चित कपल आहे. १८ नोव्हेंबरला प्रसाद-अमृताचा मोठ्या दिमाखात लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, संगीत, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा दोघांचा पाहायला मिळाला होता. या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित राहिले होते. प्रसाद-अमृताच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. अशा या लोकप्रिय कपलमध्ये पहिलं भांडणं कधी झालं होतं? जाणून घ्या…

अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख नुकतेच ‘लोकमत फिल्मी’च्या लव्ह गेम लोचा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळेस त्यांना विचारलं की, लग्नानंतर एकमेकांबद्दल काही नवीन गोष्टी कळल्या आहेत का? यावर अमृता देशमुख म्हणाली की, “आम्ही लग्नापूर्वीपासून एकत्र राहत असल्यामुळे तेव्हा प्रसादबद्दल बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या. पहिल्यांदा मला एक गोष्ट कळली होती, ज्यामुळे आमचं पहिलं भांडणं झालं होतं. याच्या मोबाइलचा अलार्म वाजत होता आणि याने सलग १० ते १२ अलार्म लावले होते. तरीही हे महाशय झोपले होते. याला ढीम फरक पडत नव्हता तो अलार्म बराचवेळ वाजतच होता. प्रसाद बंद कर, बंद कर यार, असं मी म्हणतेय. त्याला काही फरक पडत नव्हता.”

हेही वाचा – झी मराठी वाहिनीवरील मालिका बंद होण्याचा सपाटा सुरुच, आता ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अमृता म्हणाली, “हे सगळं झालं त्याच्यानंतर बेल वाजली. आम्ही काही दिवसांपूर्वीच त्या नव्या घरात राहायला गेलो होतो. आम्हाला तिथली व्यवस्था माहित नव्हती. बेल वाजली तेव्हा मी प्रसादला म्हणाले, आता कोण आलंय ते बघ… मी दार उघडण्याच्या परिस्थितीत नाहीये. त्यावेळेस पेपरवाले आले होते, ते पेपर देऊन बेल वाजवून गेले होते. मी त्याला म्हटलं, जा बघ कोण आहे? शेवटी तो चिडून गेला. एवढं करून पेपरच होता. मग पेपर घेऊन आला आणि तो फेकला, फोन फेकला… मला का उठवलं? हे का? ते का? सुरू झालं. याची झोप इतकी गाढ आहे, हे मला तेव्हा कळालं. याला अजिबात जाग येत नाही. मलाच उठून तो अलार्म बंद करावा लागतो.”