‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या गौरव मोरे एका हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. अशातच अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गौरव मोरे एका कार्यक्रमाचं शूट सुरू असताना वेळात वेळ काढून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या ‘कलर्स मराठी’वर नव्याने सुरू झालेल्या कॉमेडी शोच्या सेटवर गेला होता. या कार्यक्रमातील बहुतांश कलाकार गौरवचे जुने मित्र आहेत. परंतु, गौरव सेटवर येण्यामागे एक खास कारण होतं ते म्हणजे भरत जाधव आणि अलका कुबल.

हेही वाचा : प्रसाद ओकच्या बायकोचा वाढदिवस! अमृता खानविलकरची मंजिरीसाठी खास पोस्ट, ‘असं’ केलं सेलिब्रेशन

भरत जाधव आणि अलका कुबल हे दोघंही मराठी कलाविश्वातील दिग्गज म्हणून ओळखले जातात. आजवर या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. या कलाकारांना लहानपणापासून टीव्हीवर पाहून गौरवने वैयक्तिक आयुष्यात प्रेरणा मिळवली होती त्यामुळे या सगळ्या मोठ्या कलाकारांबद्दल त्याच्या मनात कायम आदराची भावना असते.

हेही वाचा : अदिती-सिद्धार्थने तेलंगणातील ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला? अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं कारण…

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या सेटवर पोहोचल्यावर गौरव सर्वात आधी अलका कुबल आणि भरत जाधव यांना पाहताक्षणी त्यांच्या पाया पडला. त्यानंतर अभिनेत्याने या दोन हरहुन्नरी कलावंतांशी काही वेळ संवाद साधला. सध्या गौरवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्याने ओंकार भोजनेशी सुद्धा गप्पा मारल्या. हा व्हिडीओ मराठी बातमीवाला या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्राची लाडकी”, नम्रता संभेरावसाठी प्रसाद खांडेकरने लिहिलं खास पत्र अन् दिलं सुंदर गिफ्ट; म्हणाला, “नमा तुला…”

View this post on Instagram

A post shared by Marathi Batamiwala (@marathibatamiwalaa)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव पाहताक्षणी लगेच या मोठ्या कलाकारांच्या पाया पडल्यामुळे सध्या नेटकरी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गौरव सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात गौरवने जुही चावलाबरोबर केलेला डान्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. यावेळी अभिनेत्याने शाहरुख खानचं ‘डर’ चित्रपटातील पात्र रिक्रिएट केलं होतं. गौरवचा हा दमदार परफॉर्मन्स पाहून जुही चावला सुद्धा भारावून गेली होती.