भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज (१४ एप्रिल) राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी यानिमित्तानं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेही यानिमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लंडनमध्ये जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते. तिथे ते अभ्यास करण्यासाठी ज्या खुर्ची आणि टेबलचा वापर करायचे, त्या वस्तू आजतागायत आहेत. अभिनेता गौरव मोरेनं त्या वास्तूंना भेट दिली होती. या आठवणींना उजाळा देत गौरवने याबाबत त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात गौरवने लिहिलं, “हीच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसून बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केला होता. त्या पवित्र वास्तूला मी २०२२ साली भेट दिली होती. आज १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. थॅंक यू बाबासाहेब! तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही.”

गौरवनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही काही फोटो दिसत आहेत. काही पुस्तके, पेन व वस्तूही या फोटोंत दिसतायत. गौरवच्या या पोस्टला चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन केलं आहे. जयवंत वाडकर यांनी कमेंट करीत लिहिलं, “नमन बाबासाहेबांना”. तर अभिजीत खांडकेकरनं हात जोडून नमस्कार केल्याचे इमोजी शेअर करीत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा… “कोणतीही कारवाई…”, शूज चोरणाऱ्या डिलीव्हरी बॉयची सोनू सूदने घेतली बाजू; पण, नेटकऱ्यांनी केला विरोध

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हजारो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधील चैत्यभूमीतील स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत. तर वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांची विद्युत रोषणाई केली आहे.

हेही वाचा… स्वप्नील जोशीने घेतलं रामलल्लाचं दर्शन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “याची देही याची डोळा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गौरव ‘अल्याड पल्याड’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय तो ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. गौरवचा हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.