स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती. पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेची झलक पाहायला मिळाली. यानंतर आता आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये रेश्माबरोबर एक बालकलाकार झळकली आहे. ही चिमुकली नेमकी कोण आहे? जाणून घेऊयात…

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये रेश्मा शिंदे म्हणते, “व्यक्ती तितक्या प्रकृती…प्रत्येक घरात जशी सुई असते तसा सगळ्यांना जोडणारा धागा देखील असतो” या संवाद संपल्यावर एका चिमुकलीची एन्ट्री होते. ती नायिकेला आई…अशी हाक मारते. ही गोड बालकलाकार म्हणजे आरोही सांबरे. मालिकेत रेश्माच्या म्हणजेच जानकी रणदिवेंच्या लेकीची भूमिका आरोही साकारणार आहे.

हेही वाचा : सई ताम्हणकरचा आवडता राजकीय पक्ष कोणता? बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरींचा उल्लेख करत म्हणाली…

आरोही सांबरे हिने यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या ‘झी मराठी’च्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत आरोहीने चिंगी ही भूमिका साकारली होती. याशिवाय स्टार प्रवाहच्या तीन लोकप्रिय मालिकांमध्ये तिने याआधी काम केलेलं आहे.

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त डान्स, पतीसह नेटकऱ्यांनी केल्या खास कमेंट्स

‘मुलगी झाली हो’ मालिकेत ‘गोजिरी’, ‘शुभविवाह’ मालिकेत ‘छोटी भूमी’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये आरोहीने ‘कशिश’ हे पात्र साकारलं होतं. छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय बालकलाकार नव्या मालिकेत झळकणार असल्याने सध्या प्रेक्षकांमध्ये ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका येत्या १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. रेश्मा शिंदेबरोबर मालिकेत प्रमुख अभिनेत्याची भूमिका कोण साकारणार हे अद्याप उघड करण्यात आलेलं नाही.