scorecardresearch

Video : माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त डान्स, पतीसह नेटकऱ्यांनी केल्या खास कमेंट्स

ऐश्वर्या नारकर व अश्विनी कासार यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल, माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकल्या…

aishwarya narkar dances on famous song of madhuri dixit
माधुरी दीक्षितच्या गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा डान्स

मराठी कलाविश्वातील सगळेच कलाकार अलीकडच्या काळात सोशल मीडियावर सक्रिय असतात. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची एव्हरग्रीन जोडी त्यांच्या इन्स्टाग्राम रील्समुळे कायम चर्चेत असते. बॉलीवूड आणि मराठी कलाविश्वातील ट्रेडिंग किंवा जुन्या गाण्यावर हे दोघेही भन्नाट व्हिडीओ बनवतात. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

ऑगस्ट २००१ मध्ये बॉलीवूडमध्ये ‘लज्जा’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र “बडी मुश्किल…” या गाण्याची चर्चा रंगली होती. बॉलीवूडमध्ये हे गाणं अजरामर ठरलं. याशिवाय माधुरी दीक्षित व मनीषा कोइरालाचा अप्रतिम डान्स, सुंदर हावभाव पाहून सगळेच घायाळ झाले होते. आज २२ वर्षांनी देखील हे गाणं प्रत्येक समारंभात वाजवलं जातं. याच लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी खास व्हिडीओ बनवला आहे.

madhuri dixit father in law completed higher studies from england
पती डॉक्टर, तर माधुरी दीक्षितच्या सासऱ्यांचं शिक्षण किती? म्हणाले, “१९६३ ला इंग्लंडला गेलो अन्…”
kitchen jugaad stick bindi paper on gas cylinder
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
aishwarya narkar shares small video of her beautiful home
Video : आकर्षक सजावट, झोपाळा अन्…; ऐश्वर्या नारकर यांचं प्रशस्त घर पाहिलंत का? व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
Aishwarya Narkar and Avinash Narkar dance on shahid kapoor song Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya, video viral
Video: शाहिद कपूरच्या गाण्यावर ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकरांच्या जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : “आमचा व्हॅलेंटाईन डे १२ फेब्रुवारीला, कारण…”, जिनिलीया-रितेशने शेअर केली खास पोस्ट, देशमुखांच्या सुनबाई म्हणाल्या…

अश्विनी कासार व ऐश्वर्या नारकरांनी साडी नेसून या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. ऐश्वर्या यांनी चॉकलेटी रंगाची चौकट साडी, तर अश्विनीने मेहंदी कलरची साडी नेसल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दोघींनीही या गाण्याला साजेशा अशा डान्स स्टेप्स केल्या आहेत.

हेही वाचा : “श्रेयसची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमारने रात्रभर…”, दीप्ती तळपदेने केला खुलासा; म्हणाली, “त्या काळात…”

सध्या ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. त्यांचे पती अविनाश नारकर यांनी लव्ह इमोजी शेअर करत या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील जुन्या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट रील बनवल्याने ऐश्वर्या व अश्विनी या दोन्ही अभिनेत्रींचं कौतुक केलं आहे. “मॅडम खूप सुंदर”, “आम्हाला पण तुमच्याबरोबर रील्स बनवण्याची इच्छा आहे”, “जुन्या गाण्यांवर मस्तच व्हिडीओ बनवता” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aishwarya narkar dances on famous song of madhuri dixit badi mushkil from lajja sva 00

First published on: 12-02-2024 at 16:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×