Bharti Singh’s Husband Gifted Her An Expensive Watch : भारती सिंह छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. लवकरच ती ‘लाफ्टर शेफ ३’मधून झळकणार आहे. भारती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि यामार्फत ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडीदेखील चाहत्यांसह शेअर करत असते. अशातच आता तिला तिच्या नवऱ्याने महागडी भेट वस्तू दिल्याचं तिने यामार्फत सांगितलं आहे.
भारती सिंहचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल असून ती अनेकदा यावरील व्लॉगमधून तिच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल सांगत असते. अशातच तिने नुकताच नवीन व्हिडीओ शेअर केला असून यामधून तिला तिचा नवरा हर्षने महागडं घड्याळ भेट म्हणून दिल्याचं सांगितलं आहे. या व्लॉगमध्ये भारती हर्षला तिला Bvlgariचं घडळ्याल हवं आहे असं म्हणताना दिसते.
भारतीला झाले अश्रू अनावर
व्हिडीओमध्ये पुढे हर्षने सांगितलं की “हेच ते घड्याळ आहे, जे भारतीला हवं होतं”. हर्षने याबद्दल भारतीला काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे यानंतर भारतीने हर्षने दिलेलं गिफ्ट उघडलं तेव्हा त्यात तेच घड्याळ पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने हे घड्याळ तिला कधीपासून हवं होतं आणि हर्षने तिला ही भेटवस्तू दिली यासाठी ती खूप आभारी आणि आनंदी असल्याचं म्हटलं आहे. पुढे भारती भावूक झाल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळतं. यावेळी तिच्या डोळ्यांतून अश्रू देखील आल्याचं दिसतं.
हर्षने भारतीला दिलेल्या Bvlgariच्या घड्याळाची किंमत एक लाखांपासून सुरू होते. या घड्याळाचे वेगवेगळे प्रकार असून त्यानुसार त्यांच्या किमतीत वाढ होत जाते, यामुळेच हर्षने भारतीला एवढं महागडं घड्याळ भेट म्हणून दिल्याने तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आल्याचंही पाहायला मिळतं.
दरम्यान, भारती लोकप्रिय विनोदी अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये काम करत प्रेक्षकांना हसवलं आहे. यासह ती अनेक रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही करताना दिसते. तिच्यासह हर्षसुद्धा अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असते.
