‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या मालिकेच्या कथेत वरचेवर वळण येत असतात. तर आता ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. कालच या मालिकेमध्ये अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा सप्ताह सुरु झाला. तर आता त्या निमित्ताने अधिपतीने अक्षरासाठी एक खास उखाणा घेतला आहे.

या मालिकेला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळे यामध्ये अक्षराची भूमिका साकारत आहे तर अभिनेता ऋषिकेश शेलार यात अधिपतीची भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्यांच्या साखरपुड्यानिमित्त त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.

sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

आणखी वाचा : “मित्रही आहेत आता होणारे पती…”, साखरपुड्याच्या निमित्ताने अक्षराचा अधिपतीसाठी खास उखाणा

गेले अनेक दिवस अक्षरा आणि अधिपती यांच्या साखरपुड्याची सर्वत्र चर्चा आहे. तर या साखरपुड्याच्या सिक्वेन्सच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अधिपतीने अक्षरासाठी खास उखाणा घेतला. ऋषिकेश म्हणाला, “पहिल्या भेटीत आवडली ती, नाव तिचं अक्षरा, अंबाबाईकडे एवढंच मागणं, असाच खळाळता राहू दे प्रेमाचा झरा.”

हेही वाचा : “विराजसने मला…” शिवानी रांगोळेने सांगितलं बरेच महिने छोट्या पडद्यापासून दूर राहिल्याचं कारण

अधिपतीने अक्षरासाठी घेतलेला हा उखाणा आता त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तर या मालिकेच्या आगामी भागांबद्दल सर्वजण उत्सुकता व्यक्त करत आहेत.