छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘इमली’मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेतल यादव यांचा नुकताच गंभीर अपघात झाला आहे. रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना त्याचा अपघात झाला. शूटिंग संपवून घरी परत जात असताना त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. मात्र हेतल यादव या अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत.

हेतल यादव रविवारी शूटिंग संपवून घरी परतत होत्या. यावेळी त्या स्वतः त्यांची चालवत होत्या. तेव्हा मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. याबाबत भाष्य करताना त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं, “रात्री पावणे नऊ वाजता माझं शूटिंग संपलं आणि मी फिल्मसिटीहून घराकडे निघाले. मी JVLR महामार्गावर पोहोचताच एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली आणि माझी गाडी एका बाजूला ढकलली गेली.”

आणखी वाचा : ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन, गाडी ५० फूट खोल कालव्यात कोसळली

पुढे त्या म्हणाल्या, ‘मी हिंमत एकवटली आणि माझ्या मुलाला बोलावले. मला धक्का बसल्यामुळे मी माझ्या मुलाला अपघाताबाबत पोलिसांना कळवण्यास सांगितले.सुदैवाने मला दुखापत झाली नाही, पण अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर आलेले नाही.”

हेही वाचा : “जीवाला हुरहूर लावून…” ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर ‘वहिनीसाहेब’ हळहळल्या

हेतल गेल्या २५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘ज्वाला’ची भूमिका साकारत त्या सगळ्यांच्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या ट्या मालिकेतील कामाचे सर्वत्र कौतुक झाले. तर आता त्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत शिवानी राणाची भूमिका साकारत आहेत.