Kapil Sharma Talks About His Love Story : कपिल शर्मा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक वर्ष तो ‘द कपिल शर्मा शो’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा. त्यानं चित्रपटातही काम केलं आहे. त्याशिवाय कपिलचा स्वत:चा व्यवसायही आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कपिलनं आज इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे.

कपिल आज हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तो अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे तो चर्चेत असायचा. अशातच आता त्यानं नेटफ्लिक्स स्पेशल कपिल शर्मामध्येच त्याची बायको गिनीबरोबरच्या प्रेमकहाणीची माहिती दिली आहे.

कपिल शर्माने सांगितली त्याची प्रेमकहाणी

कपिल म्हणाला, “गिनीची आणि माझी पहिली भेट कॉलेजमध्ये झालेली. ती कॉले़जला यायची २० लाखांच्या गाडीतून आणि मी त्यावेळी सेकंड हॅण्ड स्कूटर खरेदी केली होती. माझे मित्र येऊन मला सांगायचे की, तिला तू आवडतोस. तेव्हा माझा विश्वास बसायचा नाही आणि मी म्हणायचो की, तिची गाडी पाहिली आहे आणि माझी स्कूटर पाहिलीये का?”

कपिल पुढे म्हणाला, “जितक्या पैशात मी स्कूटर खरेदी केलीय, तेवढ्या पैशात ती तिच्या गाडीमध्ये पेट्रल टाकत असेल. तेव्हा मी विचार करायचो की, ज्या मुलीचे वडील २० लाखांच्या गाडीतून मुलीला कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवतात, ते जर मारायला आले, तर किती गाड्यांमधून येतील.” कपिलनं पुढे गिनीबरोबरच्या डेटिंगबद्दल सांगितलं आहे.

कपिल प्रेमकहाणी सांगत म्हणाला, “आम्ही खूप भीत भीत डेटिंग करायचो. वर्षातून साधारण फक्त चार वेळा भेटायचो. मुंबईला येऊन मला कळलं की तुम्ही मोकळेपणानं डेट करू शकता. डेट करणं काही गुन्हा नाहीये. आम्ही छोट्या शहरांमध्ये काय डेट करणार, कुठे जाणार, फार फार तर नूडल्सच्या दुकानात जाऊन बसू. तेव्हा ४० रुपयांना नूडल्सची प्लेट मिळायची.”

कपिल पुढे म्हणाला,”आमचं प्रेम कसं असायचं- एक कोल्ड ड्रिंकमध्ये दोन स्ट्रॉ टाकून. आम्ही दोघे जर प्यायलो, तर तीच खूप मोठी गोष्ट असयाची. आम्ही गरीब लोक आहोत काय करणार.”