प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण कुंद्रा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. तेजस्वी प्रकाशबरोबर त्याची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत असते. ‘बिग बॉस १५’मध्ये या दोघांची जोडी खूप चर्चेत होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ही जोडी सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत राहिली आहे. अनेकदा त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण आता करण कुंद्राचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

करण कुंद्राने अलिकडेच एक व्हिडीओ शूट केला आहे. ज्याचं नाव ‘अखियां’ असं आहे. या व्हिडीओ तो १२ वर्षीय रिवा अरोरासह दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रिवा अरोरा एका अशा मुलीच्या भूमिकेत दाखवली गेली आहे जी आपल्या बॉयफ्रेंडचा विश्वासघात करते आणि करण कुंद्राबरोबर रोमान्स करताना दिसते. या व्हिडीओमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीबरोबर रोमान्स करत असलेल्या करण कुंद्रावर चाहते भडकले आहेत.

आणखी वाचा- Bigg Boss 16 : अब्दू रोजिक वयाने स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात, शिव ठाकरे म्हणाला…

युजर्सनी केवळ करण कुंद्रावरच नाही तर रिवा अरोराच्या पालकांवरही राग काढला आहे. युजर्सचं म्हणणं आहे की रीवा अजूनही लहान आहे आणि तिला अशा प्रकारे ऑनस्क्रीन लैंगिक किंवा रोमँटिक भूमिकांमध्ये दाखवणं योग्य नाही. युजर्स करण कुंद्रालाही खूप सुनावताना दिसत आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मध्ये विकी कौशलच्या भाचीच्या भूमिकेत दिसलेल्या १२ वर्षीय रिवाला आता ३८ वर्षीय करण कुंद्रासह कास्ट करण्यात आल्याने युजर्स संतापले आहेत. वयाने लहान असलेल्या मुलीसह अशाप्रकारे काम करताना तुला लाज वाटत नाही का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

आणखी वाचा-“असा ऐतिहासिक चित्रपट…” राज ठाकरे यांच्याकडून ‘हरिओम’चं कौतुक

इतकंच नाही तर लोक रिवा अरोराचं वय आणि तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. रिवा अरोराने वयाने मोठे दिसण्यासाठी काही इंजेक्शन्स घेतली आहेत का? असा प्रश्नही युजर्सना पडला आहे. रिवा अरोरा अवघ्या १२ वर्षांची आहे पण तिचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळे हैराण झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिवा अरोरा ही सोशल मीडिया स्टार आणि बालकलाकार आहे. ती काही चित्रपटांमध्येही दिसली आहे. रिवा अरोरा ही विकी कौशल स्टारर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ आणि जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात दिसली होती. रिवा अरोराने रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांच्यासह काम केलं आहे. ती ‘रॉकस्टार’ आणि ‘हसीना पारकर’ सारख्या चित्रपटातही दिसली होती.