काही वर्षांपूर्वी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हा कार्यक्रम सुरू झाला आणि कार्तिकी गायकवाड सर्वांच्या घराघरात पोहोचली. सारेगमप लिटिल चॅम्प्स च्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरली होती. तर आता कार्तिकी तिच्या गायनाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळलं आहे.

कार्तिकीचा चाहता वर्ग मोठा आहे. काही वर्षांपूर्वी तिने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. कार्तिकी आणि रोनित नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतात. नुकतंच दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांच्या घरी एका नव्या सदस्याचं आगमन झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : आर्या, रोहित व कार्तिकीला मुग्धा-प्रथमेशच्या नात्याबद्दल आधीच माहीत होतं? प्रतिक्रिया देत दोघं म्हणाले, “सेटवर ते…”

कार्तिकी आणि रोनित यांची लाईफस्टाईल चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तर आता दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. किया कंपनीची ही गाडी आहे. ही गाडी खरेदी करतानाचा एक व्हिडिओ त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गाडी घेतल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर शोरूममध्ये जाऊन ही नवीन गाडी तब्यात घेताना दिसत आहेत. रोहितने काही कागदपत्रांवर सही करून ती गाडी घेतल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याबरोबरच त्यांनी गाडीची पूजा करून गाडी घरी नेल्याचंही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ शेअर करत त्या दोघांनी लिहिलं, “ताफ्यात आणखी एकीचा समावेश…” कार्तिकी आणि रोनितने शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्यांचे चाहते कमेंट करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.