सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा १४ वे पर्व सुरु आहे. मागच्या अनेक पर्वांपासून महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत आहेत. काही पर्वांमध्ये शाहरुख खाननेही सूत्रसंचालक म्हणून काम केले होते. सध्या ‘केबीसी’चा शो आणि अमिताभ बच्चन हे समीकरण प्रेक्षकांच्या मनामध्ये पक्क झालं आहे. खेळादरम्यान स्पर्धकांशी गप्पा मारत त्यांचे मनोबल वाढवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. काही वेळेस ते बोलताना त्यांच्याशी खासगी गोष्टी सुद्धा शेअर करतात. नुकताच त्यांचा या शोमध्ये लायन वॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनी टिव्हीच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या भागाचा प्रोमो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या भागामध्ये त्यांच्यासमोर पूजा त्रिपाठी हॉटसीटवर बसल्या होत्या. खेळ सुरु असताना जेव्हा त्या अमिताभ यांच्याशी गप्पा मारत होत्या. तेव्हा त्यांनी “तुमच्या घरामध्ये ऐश्वर्या राय मॅम आहेत, त्यांनी तुम्हाला रॅम्प वॉक करायला शिकवलं आहे का?”, असा प्रश्न विचारला. त्यावर अमिताभ यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर पूजा “तुम्हाला माझ्यासह लायन वॉक करायला आवडेल का?”, असे म्हणाल्या. बच्चनसाहेबांनी त्यांच्या इच्छेला मान देत लगेच होकार दिला.

आणखी वाचा – “विकी कौशलविषयी बोललो की तू…” सलमान खानने कतरिना कैफसमोर केली उघडपणे कमेंट

पुढे त्या दोघांनी लायन वॉक करत मंचावर एन्ट्री घेतली. त्यावेळी पूजा त्रिपाठींनी विशिष्ट शैलीमध्ये त्यांचा हात पकडला होता. मंचाच्या मध्यभागी चालत येऊन त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडे पाहत छान पोझ दिली. यावर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. कॅट वॉकप्रमाणे लायन वॉकसुद्धा फॅशन विश्वामध्ये फार प्रचलित आहे. बहुतांश वेळा फॅशन शोमध्ये लायन वॉक केला जातो.

आणखी वाचा – “हे एका मुलीबरोबर घडलं असतं तर…” विराटच्या रुमच्या व्हायरल व्हिडीओनंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या राय-बच्चन यांनी मॉडेलिंग करत करिअरची सुरुवात केली होती. काही वर्ष या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर तिने मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेता होता. तिने १९९४ सालचा ‘मिस वर्ल्ड’ किताब जिंकला होता. मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.