‘कोण होणार करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर कोट्यधीश होण्याची अनोखी संधी सामान्य नागरिकांना या कार्यक्रमातून मिळते. नव्या पर्वातून कोट्यधीश होण्याची आणखी एक संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यंदाच्या पर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला एक नव्हे तर तब्बल २ कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

कोट्यधीश होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो. पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी ‘सोनी मराठी’ वाहिनी पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या आधीच्या सगळ्या पर्वांना स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मनोरंजनाबरोबरच ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्‍या या कार्यक्रमात ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील पर्वांमुळे सगळ्यांना आली आहे.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ने १००० कोटींची कमाई केल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली “बॉयकॉट गँग…”

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, कोकणस्थ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सचिन या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागी स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं काम मोठ्या खुबीने करताना दिसतात.

हेही वाचा>> बॉलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक सहभागी होण्यासाठी नोंदणी करून घेऊ शकतात. यंदाच्या सिझनमध्ये काय वेगळेपण असेल? स्पर्धक कसे असतील? २ कोटी रुपये कोणी जिंकू शकेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.