‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून स्मृती इराणी यांना ओळखले जाते. या मालिकेतील त्यांनी साकारलेली ‘तुलसी विरानी’ ही भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेमुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या. यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आता त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्या मालवणी भाषेबद्दल बोलताना दिसत आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना कोकणी, मालवणी या भाषेबद्दल प्रचंड प्रेम वाटते. यातील अनेकजण ही भाषा शिकत आहेत. तर काहींना या भाषेत संवादही साधता येतो. आता तुलसी विरानी म्हणून घराघरात पोहोचलेल्या स्मृती इराणी यांनी या भाषेबद्दल प्रेम वाटत असल्याचा खुलासा केला आहे.आणखी वाचा : “मॅडम, वजन कमी करण्यासाठी टीप्स द्या”, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण थक्क केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना "मी असं ऐकलंय तुम्हाला खूप भाषा बोलता येतात, मग तुम्हाला मालवणी बोलता येतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी चक्क मालवणी भाषेत उत्तर दिलं. यावर उत्तर देताना त्यांनी "म्हणजे काय, मला मालवणी नक्कीच येत. माका पिठी-भात आवडता", असे म्हटले. आणखी वाचा : “हिला काहीच येत नाही…” स्मृती इराणींनी केला ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या कास्टिंगबद्दल खुलासा दरम्यान स्मृती इराणी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मृती इराणी यांनी ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ याबरोबर अनेक मालिकेत काम केले. त्या अनेक बंगाली चित्रपटातही झळकल्या. पण आजही लोक त्यांना 'तुलसी' या पात्राच्या नावानेच ओळखतात. सध्या स्मृती इराणी या राजकारणात जास्त सक्रीय आहेत.