Laxmichya Paulanni : छोट्या पडद्यावरील कलाकारांचा घराघरांत एक वेगळा चाहतावर्ग तयार होतो. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे साहजिकच या वाहिनीवरच्या बऱ्याच मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा अग्रेसर ( टॉप-५ मध्ये) असतात. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. कला आणि अद्वैतची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा कायम टॉप-४ मध्ये असते. याच ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ( Laxmichya Paulanni ) या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अक्षर या मालिकेत अद्वैत चांदेकर ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर त्याच्या दोन भावांच्या भूमिकेत ध्रुव दातार आणि रुत्विक तळवलकर असे दोन अभिनेते झळकत आहेत. यापैकी राहुलची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव दातारने मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : “मला तुमच्या माफीची गरज नाही”, सोनाक्षी सिन्हाचे मुकेश खन्ना यांना थेट उत्तर; रामायणसंदर्भातील टीकेवर म्हणाली…

मालिकेतून एक्झिट घेतल्यावर अभिनेत्याची पोस्ट

ध्रुवने स्वत: याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेता लिहितो, “‘राहुल’च्या भुमिकेतून मी प्रेक्षकांचा निरोप घेतोय. या संधीबद्दल ‘स्टार प्रवाह’ आणि ‘फ्रेम्स प्रोडक्शन’ कंपनीचे आभार मानतो. अक्षर कोठारी, मंजुषा गोडसे, दीपाली पानसरे तुम्ही सर्वांनी मला वेळोवेळी मदत केली यासाठी तुमचे खूप खूप आभार… मी तुम्हाला खरंच खूप मिस करेन. भविष्यात तुमच्याबरोबर पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची संधी मिळो अशी आशा आहे.” ध्रुवने पुढे या पोस्टमध्ये दिग्दर्शकाचे व आपल्या चाहत्यांचे सुद्धा आभार मानले आहेत.

ध्रुवने अचानक मालिकेतून एक्झिट घेतल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. पण, आता लक्ष्मीच्या पाऊलांनी ( Laxmichya Paulanni ) मालिकेत राहुलची भूमिका अभिनेता अद्वैत कडणे साकारणार आहेत. त्याने यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सुद्धा काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता अद्वैत कडणेच्या रुपात नवीन राहुल पाहायला मिळेल.

हेही वाचा : दिसण्याबद्दल विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…”

View this post on Instagram

A post shared by Dhruva Datar (@dhruva_datar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ( Laxmichya Paulanni ) ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. या मालिकेत प्रेक्षकांना दमदार अशी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.