एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती चालतो त्यावर त्याचं यश अवलंबून असतं. तसंच मालिकांमध्ये टीआरपीवरून त्यांची लोकप्रियता आणि यश समजते. टीआरपीच्या शर्यतीत सर्वांत पहिलं स्थान मिळवण्यासाठी सर्वच मालिकांची मोठी चढाओढ सुरू असते. अशात स्टार प्रवाह वाहिनीवर काही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. नवीन मालिका शर्यतीत येत असताना जुन्या मालिकांना टीआरपीच्या शर्यतीमध्ये यशस्वी होण्यासाठी मोठी धडपड करावी आलगे.

अशात या आठवड्याचा टीआरपीचा आकडा आला आहे. यावेळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने टीआरपीमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. टीआरपी शर्यतीत पहिला क्रमांक आल्यावर मालिकेच्या सेटवर याचा आनंद साजरा करण्यात आला आहे. मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र येत सुंदर सेलिब्रेशन केलं आहे. या सेलिब्रेशनचा एक फोटो मालिकेतील अद्वैत चांदेकर म्हणजेच अक्षर कोठारीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

फोटोमध्ये दिसत आहे अद्वैत, आबा व सरोज असे तिघे मिळून केक कापत आहेत. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका १८ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंतच्या आठवड्यापासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्याच क्रमांकावर आहे. २५ जानेवारी ते ३१ जानेवारीच्या आठवड्यात ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेला ५.८ इतकं रेटिंग मिळालं आहे. तर कायम पहिल्या क्रमांकावर असणारी ‘ठरलं तर’ मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून, या मालिकेला ५.४ टीआरपी रेटिंग मिळालं आहे.

तिसऱ्या स्थानावर ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका आहे. या मालिकेला ५.२ रेटिंग मिळालं आहे. तसेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला ४.८ रेटिंग मिळालं आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला ४.४ रेटिंग मिळालं आहे.

‘लक्ष्मिच्या पाऊलांनी’ मालिकेमध्ये कला खरे आणि अद्वैत चांदेकर या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली आहे. मालिकेमध्ये दोघेही सतत भांडत असतात. मात्र, त्यांच्या या भांडणातही दडलेलं खरं प्रेम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. मालिकेमध्ये सध्या कलाची आई संगीता खरे आजारी आहे. त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी कला माहेरी आली आहे. चार दिवसांसाठी माहेरी आलेली असताना अद्वैतपासून दूर राहावे लागू नये म्हणून कला काही ना काही कारणाने त्याला माहेरी बोलावत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लक्ष्मिच्या पाऊलांनी’ मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट आला होता. नयना गरोदर असल्याने तिच्या ओटीभरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, ती गरोदर नसल्याचं रोहिणीच्या लक्षात आलं आणि तिनं सर्वांसमोर नयनाचा डाव मोडून काढला होता. त्यावर कलानं मला असं करण्यास सांगितलं, असं नयना म्हणाली होती. मात्र, कलानंही ती निर्दोष असल्याचं सर्वांसमोर सिद्ध केलं होतं. त्यामुळे आता अद्वैतच्या मनात कलाविषयी आदर आणखी वाढला आहे.