Madhavi nimkar Dance Video : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रचंड गाजलं. मात्र, त्यातही एका पात्राला मुख्य अभिनेत्रीपेक्षाही जास्त लोकप्रियता मिळाली; ते पात्र म्हणजे शालिनी. अभिनेत्री माधवी निमकर हिने ते पात्र इतक्या छान पद्धतीने साकारलं की चाहत्यांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं.
आपल्या खलनायिकेच्या भूमिकेनेही तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर माधवी तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करीत असते. तसंच माधवी तिचे व्यायाम करताना आणि योगाचे काही फोटोही शेअर करताना दिसते.
मात्र, माधवीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. माधवीने तिच्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. गोविंदाच्या गाजलेल्या गाण्यावर तिने डान्स केला असून तिचा हा डान्स अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.
माधवीने गोविंदाच्या ‘मैं तो रस्ते से जा रहा था’ या गाजलेल्या गाण्यावरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या या गाजलेल्या गाण्यावर माधवीनं अगदी सारखाच डान्स केला आहे. माधवीनं या गाण्यात गोविंदा आणि करिश्मासारख्याच हुबेहूब स्टेप्स केल्या आहेत, त्यामुळे तिचा हा डान्स चाहत्यांना आवडला आहे.
माधवी निमकरचा डान्सचा व्हिडीओ
सर्वांचं आवडतं गाणं अशी कॅप्शन देत माधवीनं हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘बोले तो झकास’, ‘क्या बात है’, ‘वाह वाह’, ‘खूप छान माधवी’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गोविंदाच्या काही लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मैं तो रस्ते से जा रहा था’ हे गाणं. कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी हे गाणं गायलं आहे, तर गाण्याचं संगीत आनंद मिलिंद यांनी केलं आहे. १९९५ मध्ये आलेल्या ‘कुली’ सिनेमातलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.
माधवी निमकरच्या नव्या घराची पोस्ट
माधवीबद्दल सांगायचं झाल्यास, तिनं नुकतंच मुंबईत दुसरं घर घेतलं आहे. या घराचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घराचं काम अद्याप पूर्ण झालं नाही. मुंबईच्या मालाडमध्ये तिनं हे दुसरं नवीन घर घेतलं आहे.
