Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी हास्यजत्रेच्या लाइव्ह शोजचं देखील आयोजन केलं जातं. अमेरिका, दुबई, लंडन, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातील विविध ठिकाणी हास्यजत्रेचे शो पार पडले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील सगळे कलाकार नुकतेच गेट-टुगेदर पार्टीसाठी एकत्र जमले होते. यावेळी या सगळ्या कलाकारांनी एकत्र मिळून धमाल केल्याचं पाहायला मिळालं. प्राजक्ताने या गेट-टुगेदर पार्टीतील खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या गेट-टूगेदरला समीर चौघुलेंनी सुंदर जुनं गाणं गायलं. यावेळी सगळे कलाकार एकत्र बसून गाण्यांची मैफिल एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्राजक्ताप्रमाणे नम्रता संभेरावने शेअर केलेल्या एका जबरदस्त डान्स व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात सगळ्या कलाकारांनी मिळून ट्रेंडिंग गाण्यावर बेभान होऊन डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

नम्रताने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमध्ये पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, निखिल बने, रोहित माने, वनिता खरात, वनिताचा पती सुमीत लोंढे, मंदार मांडवकर, प्रसाद खांडेकर, अरुण कदम या सगळ्या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. या सगळ्या कलाकारांनी मिळून “सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात…” या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वप्नील जोशीने या व्हिडीओवर कमेंट करत “मॅड-मॅड गँग…” असं म्हटलं आहे. तर, हास्यजत्रेच्या अन्य काही चाहत्यांनी या व्हिडीओवर, “हास्यजत्रेची येडी जत्रा मस्त डान्स केलात”, “फुल धिंगाणा”, “मस्त डान्स केलात” अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्ययान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना घराघरांत प्रसिद्धी मिळाली. या शोमधले सगळेच हास्यवीर दरवेळी नवनवीन विषयांवर आधारित स्किट सादर करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात.