अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तर त्यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. तिथे यश मिळवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याने ठाण्यात स्वतःच नवीन हॉटेल सुरू केलं. सुप्रिया पठारेंचे मनोरंजनसृष्टीतील मित्र मंडळीही अनेकदा या हॉटेलमध्ये भेट देत असतात. तर कालच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने मिहिरच्या या नवीन हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.

नम्रता संभेराव गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून भेटायला येत आहे. या कार्यक्रमाने तिला वेगळी ओळख दिली. तरी या कार्यक्रमात तिने साकारत असलेली लॉली सर्वांनाच खूप आवडते. सुप्रिया पाठारे ही तिच्या या पात्राच्या प्रेमात आहेत. ही लॉली काल त्यांच्या ‘महाराज’ हॉटेलमध्ये आली आणि त्यानिमित्त सुप्रिया पाठारे यांनी एक खास पोस्ट लिहिली.

आणखी वाचा : ‘असं’ आहे सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ठाण्यात सुरू केलेलं नवीन हॉटेल, पाहा खास झलक

काल नम्रता तिच्या नवऱ्याबरोबर सुप्रिया पठारे यांच्या मुलाच्या ‘महाराज’ हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी काढलेला एक फोटो सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला. फोटो खाली लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यांनी लिहिलं, “मेरे आँखों मे झांको महाराज में झांको असं महणतेय आपल्या सगळ्यांची लाडकी लॉली म्हणजेच नम्रता आवटे-संभेराव.” तर त्यावर नम्रतानेही हटके कमेंट केली. तिने लिहिलं, “Yewww लेकिन महाराज में जरूर झांको.”

हेही वाचा : “फूड सेंटर सुरू करायचं ठरवलं तेव्हा…”, लेकाच्या हॉटेलबद्दल सुप्रिया पाठारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पाव भाजीबरोबरच इथे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मिहीर पठारेचं हे नवीन हॉटेल ठाण्यातील खेवरा सर्कल, रामजी हॉटेलच्या समोर, पोखरण, रोड नं २ वर आहे.